जळगाव- हाॅटेल पालखीचा परवाना रद्द करण्याबाबातची नाेटीस गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने हाॅटेलचे संचालक यांना दिली अाहे. यावर १० जून राेजी सुनावणी हाेणार असून त्यािदवशी संचालकाला लेखी खुलासा सादर करण्याचे नाेटीसीत म्हटले अाहे. दरम्यान, सोहम जोशी खंडणी प्रकरणातील तिघा संशयित अाराेपींच्या पाेलिस काेठडीची मुदत संपल्याने त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात अाले हाेते. या वेळी गुन्ह्यात वापरलेली व्हॅन जप्त करणे बाकी असल्याने अाराेपींना काेठडी देण्याची मागणी सरकारी वकील तपासाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांच्या काेठडीत एक दिवसाने वाढ केली अाहे.
हॉटेल पालखीमध्ये झालेल्या अवैध प्रकाराबाबत फिर्यादी स्नेहा मिलिंद जोशी यांनी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर झालेल्या पोलिस चौकशीअंती या हॉटेलचा परवाना रद्द होण्याचा प्रस्ताव बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ.जिलांदर सुपेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला हाेता. गुरुवारी याप्रकरणी जिल्हाल्हािधकारी कार्यालयाने हॉटेल पालखीचा परवाना रद्द करण्याबाबतची नोटीस हॉटेलचे संचालक सुरेश हुकमतराय जाधवाणी (प्लॉट नंबर १, गायत्रीनगर) यांना दिली आहे. येत्या १० जून रोजी यावर सुनावणी होणार असून या वेळी हॉटेलच्या संचालकांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडण्याचे कळवले आहे.
सुनावणीच्या दिवशी लेखी खुलासा प्राप्त झाल्यास आपले काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून हॉटेल पालखी इंटरनॅशनल या नावाने देण्यात आलेला खाद्यगृह परवाना क्रमांक ०६-२०१४ रद्द करण्याची कडक कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधकाऱ्यांनी िदलेल्या नोटीशीत म्हटले आहे. त्यामुळे १० जून राेजी सुनावणीत हाॅटेलचे संचालक काय खुलासा सादर करतात याकडे लक्ष लागून अाहे. दरम्यान, साेहम जाेशी प्रकरणात गुरूवारी रात्री उशीरापर्यत स्नेहा जाेशी यांची रामानंदनगर पाेिलस कर्मचाऱ्यांनी चाैकशी केली.
अाणखी एक कलम वाढले
या प्रकरणात मारहाण करणे, खंडणी वसुली यासारखे गंभीर गुन्हे अगाेदरच दाखल अाहेत. बुधवारी संशयिताच्या घरात १४ इंच लांबीचा चाकू सापडल्याने अार्म अॅक्ट ४(२५)चे कलम वाढवण्यात अाले.
व्हॅन जप्त करण्यासाठी काेठडीची मागणी
गुरुवारीसुनावणीत गुन्ह्यात अाराेपींनी वापरलेली व्हॅन अजून जप्त करायची असल्याने अाणि दाेन अाराेपी फरार असल्याने सरकार पक्षातर्फे अॅड.राजेश गवई तपासाधिकारी प्रवीण वाडिले यांनी त्यांच्या पाेलिस काेठडीची मागणी केली. त्यावर गणेश जगतापतर्फे अॅड.मुकेश िशंपी यांनी एकाच कारणासाठी काेठडी मागितली जातेय. तसेच फरार अाराेपींशी अामचा संबंध नसून, व्हॅनचा वापर झालेला नाही. त्यामुळे न्यायालयीन काेठडीची मागणी केली. गणेश धामणेतर्फे बाजू मांडताना अॅड.दीपक कासार यांनी संशयितांकडून मुद्देमाल हस्तगत केला अाहेे. संशयित व्यावसायिक असल्याने मूळ फिर्यादी स्नेहा जाेशी यांना त्याने ६५ हजार उसनवार िदले हाेते. ते पैसे मागण्यासाठी गेले तेव्हा फिर्यादीने नाेटरी अाणि चेक दिला हाेता. ताे परत करण्यात अाला असल्याचे सांगितले. याेगेश चाैधरीतर्फे अॅड.कुणाल पवार यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी तपासाला ४८ तास पूर्ण झाले असून, या गुन्ह्यात काेणत्याही प्रकारची गाडी वापरलेली नाही. तसे असते तर फिर्यादीला तिचा रंग क्रमांक का सांगता येत नाही? असे सांगितले.
संशयित अाराेपींकडून या वस्तू केल्या जप्त
पाेलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त केला अाहे. त्यात लाकडी दंडुका, हुक्क्याचे रिकामे खाेके,फिर्यादीचे पॅनकार्ड, अाेळखपत्र, स्टेट बँकेचे पासबुक, वाहन चालवण्याचा परवाना, १४ इंच लांबीचा चाकू, फिर्यादीने गणेश धामणेला दिलेला ६५ हजार रुपयांचा धनादेश गणेश जगतापला राहुल नाईकच्या नावाने दिलेला ८० हजार रुपयांचा धनादेश यांचा समावेश अाहे.
>साेहम प्रकरणातील तिघा अाराेपींच्या काेठडीत वाढ
>स्नेहा जाेशी यांची रात्री उशिरापर्यंत चाैकशी