आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांची खवय्येगिरी; हॉटेल्सची संख्या तिप्पट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावकरांची कुटुंबासह बाहेर जेवणासाठी जाण्याची मानसिकता अाणि जीवनशैली िदवसेंदिवस वाढत अाहे. या बाबीचा अभ्यास करून फास्ट फूडसाठी डाॅमिनाेज, कॅफे चाॅकलेट यांच्या फ्रँचायझी शहरात सुरू झाल्या अाहेत. यासह फॅमिली व्हेज लज्जतदार जेवण देणाऱ्या रेस्टाॅरंटची संख्या गेल्या पाच सहा वर्षांत तीन पटीने वाढली अाहे. गुणवत्तापूर्ण जेवण अाणि बजेटचा िवचार हाेत असल्याने दाेन्ही गाेष्टींचा िवचार रेस्टाॅरंटचालकांकडून करण्यात अाला असल्याने ग्राहकांनाही चांगले पर्याय उपलब्ध झाले अाहेत.
अार्थिक घाेटाळे, रखडलेली िवकासकामे अशी जळगाव शहरासंदर्भात वारंवार अाेरड केली जाते. दुसरीकडे प्रचंड अार्थिक उलाढाल असलेल्या जळगाव शहरातील हाॅटेल्स अाणि रेस्टाॅरंट मार्केटमध्ये हाेत सुप्त बदलांची नाेंद मात्र घेतली जात नसल्याची स्थिती अाहे. उद्याेजक, व्यावसायिक, नाेकरदार अाणि मध्यमवर्गीयदेखील कुटुंबासह बाहेर पडते. मुंबई, पुण्यासारखी जीवनशैली येथेदेखील रुजत चालली अाहे. याचा अभ्यास हाॅटेल व्यावसायिकांनी केल्याने सात-अाठ वर्षांत रेस्टाॅरंटची संख्या १० वरून ३०च्या घरात गेली अाहे. यासह राॅयल पॅलेस, मैत्रेय, िसल्व्हर पॅलेस, िरगल पॅलेस, प्रेिसडेंट काॅटेज, डायमंड पॅलेस यासह इतर बड्या हाॅटेल्स‌् अलीकडच्या काळात उभारल्या गेल्या असून काहींनी अंतर्गत बदल केले अाहेत. अजून काही मंडळी जळगावातील हाॅटेल्स अाणि रेस्टाॅरंट व्यवसायात येण्यास उत्सुक अाहेत. नाेकर वर्ग मध्यमवर्गीयांच्या अावडी-निवडी अाणि बजेटचा अभ्यास करत पाच-सहा वर्षांत शहरात महामार्गालगत नव्याने काही रेस्टाॅरंट सुरू झाले अाहेत. काही नामांकित ब्रॅण्डने अापल्या शाखा जळगावात सुरू केल्या अाहेत. या हाॅटेल्स अाणि रेस्टाॅरंटच्या माध्यमातून अर्थचक्र फिरण्यास मदत हाेत असून राेजगारही उपलब्ध झाला अाहे.
500 रुपयांत संतुष्ट
मध्यमवर्गीयकिंवा नाेकरदारांची क्रयशक्ती अाणि कुटुंबासाेबत सुटीच्या िदवशी बाहेर जाण्याचा कल वाढत चालला अाहे. रस्त्यावरच्या गाड्यांवरील खाद्यपदार्थांमध्ये १०० ते २०० रुपये खर्ची करण्यापेक्षा दाेन पैसे जास्त माेजून हाॅटेलात कुटुंबीयांना खाऊ घालण्याची संस्कृती रुळत चालली अाहे. त्यामुळे नव्याने तयार झालेल्या रेस्टाॅरंटमध्येही अल्पावधीतच गर्दी अनावर होत असल्याची स्थिती अाहे. पती-पत्नी दाेन मुले अशा चार जण अशा कुटुंबाच्या शाकाहारी जेवणाचा बजेट अवघ्या ५०० रुपयांत हाेत असल्याची स्थिती अाहे.
जीवनशैलीमुळे रेस्टाॅरंट वाढले
खाद्यपदार्थांची गुणवत्ता, िदली जाणारी सेवा स्वच्छता अशा ितहेरी गाेष्टींची काळजी घेणाऱ्या रेस्टाॅरंटचालकांना या व्यवसायात यश गवसते. रस्त्यालगतच्या गाड्यांवर खाण्यापेक्षा रेस्टाॅरंटमध्ये कुटुंबाला अाणणाऱ्यांची जीवनशैली बदलल्याने रेस्टाॅरंट अाणि हाॅटेलची संख्याही वाढली अाहे. जितेंद्रकांकरिया, रेस्टाॅरंटचालक
चारही बाजूंना रेस्टाॅरंट
शहराच्यारेल्वे स्टेशन, शास्त्री टाॅवर, अजिंठा चाैफुलीसह इतर भागांत यापूर्वीपासून काैटुंबिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले रेस्टाॅरंट अाहेत. मात्र, िदवसेंदिवस ग्राहकांची वाढणारी संख्या लक्षात घेता, काही मालकांनी या परिसरात शाखा वाढवण्यास सुरुवात केली अाहे. पकवान, मुरली मनाेहर, मिर्च मसाला, जलसा, पंचवटी, उत्तम भाेज, नेवैद्य, गाेकूल ढाबा, संदीप फूड प्लाझा, गुलशने हिंद, गुजराथी फूड, हाॅटेल राजमुद्रा यासह इतरही रेस्टाॅरंट सुरू झाले अाहेत.