आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या सजावटीसाठी म्युरल्सना अधिक पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिल्पकृती पुरातन काळापासून बनवल्या जात आहेत, याचा ट्रेंड मात्र हळूहळू बदलत चालला आहे. यात म्युरलच्या आधुनिक रुपातील शिल्प मोठय़ा प्रमाणात पसंत केले जात आहेत. सध्या व्हर्टिकल म्युरलचा ट्रेंड अधिक लोकप्रिय आहे. फ्लॅट, रो-हाऊसेस, बंगलो यांची सजावट करण्यासाठी या म्युरल्सलच वापरले जात आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्येही लहान जागेचा उपयोग करायचा असल्यास सजावटीसाठी म्युरलच अग्रेसर आहे. घराला स्टायलिश लूक देण्यासाठी व्हर्टिकल म्युरल तयार केले जात आहेत. यामुळे घराचे सौंदर्य तर खुलतेच पण सकारात्मकतादेखील वाढण्यास मदत होते. या प्रकारच्या फ्रेमची बाजारात क्रेझ आहे. भेट म्हणून देण्यासाठीही सध्या वापर केला जात आहे.
व्हाइट मेटलमध्ये म्युरल

लाइफ-स्टाइलच्या दिवसेंदिवस होणार्‍या बदलांमुळे सध्या म्युरल मोठय़ा प्रमाणात वापरले जातेय. व्हर्टिकल म्युरलमध्ये अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे व्हाइट मेटलच्या (अँल्युमिनियम) म्युरललाही नागरिकांची पसंती लाभत आहे. कारण आवडेल त्या आकारात अन् हव्या त्या बजेटमध्ये हे बनवता येणे शक्य असते, तसेच दिसायलाही आकर्षक असते.

जागेचा करा सदुपयोग

म्युरलमुळे कमी जागेचा योग्य वापर करीत घराला आकर्षक बनवता येणे सहज शक्य होते. आजकाल मोठी घरे पाहायला मिळतच नाहीत, लहानशा घराला वेगळा लूक देण्यासाठी हे म्युरल उपयुक्त ठरतात, यामुळे कलात्मकदृष्ट्या घर सुंदर दिसते.