आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमधील बळीरामपेठेत घराला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बळीरामपेठभागातील गंगुबाई यादव चाळीत राहणारे हितेंद्र काळुंखे यांच्या घराला रविवारी सकाळी वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत ६० हजार रुपयांच्या गृहोपयोगी वस्तू खाक झाल्या.

काळुंखे यांचे दुमजली घर आहे. त्यातील वरच्या मजल्यावरील पुढच्या खोलीत अचानक आग लागली. काळुंखे कुटंुबीयांसह शेजारच्यांच्या लक्षात येताच परिसरात धावपळ सुरू झाली. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. पैकी एका बंबाने आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील टीव्ही, होम थिएटर, कुलर, गाद्या, पंखा यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज काळुंखे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पलंगाच्या शेजारी ठेवलेले ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातलेही गहाळ झाले आहे.

आगीत वितळले असेल किंवा पाणी मारताना ते हरवले असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी काळुंखे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

सुदैवाने अनर्थ टळला
काळुंखेयांच्या पुढच्या खोलीला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. मागच्या खोलीत ठेवलेले गॅसचे सिलिंडर घराबाहेर काढले. या शिवाय दक्षता म्हणून शेजारील दोन खोल्यांमधले सिलिंडरही रस्त्यावर आणून ठेवले होते. आत वाढण्याचा आता सिलिंडर बाहेर काढल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.