आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉकलेट खात, चांगले कपडे घालून लाखोंच्या ऐवजासह चोरटे पसार, आदर्शनगरातील बंगल्यात चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अनोळखी व्यक्तीने बँक कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून एटीएमकार्डवरील १३ अंकी क्रमांक विचारत एका बंगाली कारागिराचे एक लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार शहरात गुरुवारी घडला. 
 
अरुणकुमार नामाई चंद्र हे बंगाली कारागीर शहरातील जुन्या जळगावात राहतात. त्यांचे स्टेट बँकमध्ये खाते आहे. दरम्यान, अरुणकुमार यांना गुरुवारी ७५४४१ ४८४४८ ७०३३४ ५६२०४ या दाेन क्रमांकावरून फोन आले. समोरील व्यक्तीने आपण स्टेट बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवले. त्याने अरुणकुमार यांना तुमचे एटीएम बंद पडणार असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी कार्डवरील क्रमांक सांगा, असा आग्रह केला. त्यानुसार अरुणकुमार यांनी १३ अाकडी नंबर त्याला सांगितला. यानंतर दोन दिवसांत तीनवेळा अरुणकुमार यांच्या खात्यातून लाख हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी अरुणकुमार यांनी पोलिस तसेच स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कुणीच सहकार्य केले नाही, असा आरोप त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. 
 
किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश 
शहरातील आदर्शनगर भागातील एका पॉश बंगल्यात मंगळवारी रात्री चोरट्यांनी चोरी करून पाेबारा केला. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, चाेरट्यांनी घरात कुणीही नसल्याचा लाभ उठवत चाॅकलेटचा अास्वाद घेतला, तसेच तेथीलच उत्तम प्रतीचे कपडे परिधान करून त्यांचे मळकटलेले कपडे तेथेच साेडून सहज पाेबारा केला. 
 
आदर्शनगर येथे शेख शब्बीर हुसेन ताहेर अली सैफी यांचा बंगला आहे. शेख शब्बीर हे पत्नीसह मंगळवारी खासगी कामानिमित्त मुंबईला गेले आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री चोरट्यांनी शेख यांच्या बंगल्याच्या किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी संपूर्ण बंगल्यात फिरून सावकाशपणे सर्व साहित्याची तपासणी केली. चाेरट्यांनी दोन हॉल, दोन बेडरूम, किचन तसेच वॉशरूम अशा प्रत्येक ठिकाणी तपासणी केली. 

दोन कपाटांचे लॉक तोडून त्यातील बॅगाही चाेरट्यांनी तपासल्या आहेत. तर किचनमधील सर्व वस्तूंची फेकाफेक केली आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले चॉकलेट चाेरट्यांनी खाल्ले आहेत. तसेच वॉशरूमचा दरवाजा तोडून तेथे काही सापडते का? याचीही शहानिशा केली आहे. चोरट्यांनी प्रत्येक कपाट, कबर्ड, बॅग तपासून त्यातील ऐवज लंपास केला आहे. बाहेर पडण्यासाठी त्यांनी वरच्या मजल्यावरून बाहेरच्या बाजूला निघणाऱ्या जिन्याचा वापर केला आहे. 

या जिन्याचा दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. मात्र, चोरट्यांनी बाहेर पडल्यानंतर हा दरवाजा बाहेरून बंद केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी वाजता बंगल्यात काम करण्यासाठी आलेल्या मोलकरणीच्या चाेरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. तिने शब्बीर शेख यांना फोनवरून ही माहिती दिली. शेख यांनी आपला पुतण्या मुस्तफा जफर यांना याबाबत कळवले. मुस्तफा हे दुपारी ११ वाजता बंगल्यात पोहचले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली. शेख दाम्पत्य मुंबईवरून रात्री उशिरा जळगावात पोहचले. त्यांनी घरात ठेवलेल्या वस्तू, ऐवजाची तपासणी केल्यानंतर रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. शेख यांच्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. 
 
हाताचेठसे, कुदळ,चोरट्यांचे कपडे पोलिसांच्या ताब्यात 
चोरट्यांनीशेख यांच्या बंगल्यातील जवळपास सर्वच वस्तूंची उलथापालथ करत शहानिशा केली. शौचालयाचाही वापर त्यांनी केलेला आहे. पोलिसांनी सर्व वस्तूंवरील हाताचे ठसे घेतले आहेत. अनेक ठिकाणी पुसटसे ठसे मिळाले. तसेच चोरट्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडण्यासाठी कुदळीचा वापरकेला आहे. ही कुदळ त्यांनी घरातच ठेऊन दिली होती. ती कुदळही पोलिसांनी हस्तगत केली आहे. याशिवाय चोरट्यांनी शेख यांच्या घरातील पॉश कपडे परिधान करून स्वत:च्या कपड्यांची पिशवीदेखील तेथेच सोडून दिली. या कपड्यांच्या आधारे काही माहिती मिळते का? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅनही घटनास्थळी बाेलावली होती. तसेच श्वान पथकही बोलावण्यात आले होते. श्वानाने घराच्या बाहेर काही अंतरापर्यंतचाच माग दाखवला. चोरट्यांचे कपडे, हाताचे ठसे, तोडलेले कुलूप कुदळ असे महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...