आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकामेव्यावर ताव मारल्यानंतर चोरट्यांनी लांबविला साडेसहा लाख रुपयांचा ऐवज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सेवानिवृत्त शिक्षिकेच्या मेहरूण तलावाच्या काठावरील ‘लेक रेसिडेन्सी’ अर्पाटमेंटच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी सुका मेव्यावर ताव मारून सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. यात अडीच लाख रुपये रोख आणि लाख ८६ हजार ५०० रुपयांच्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. हा फ्लॅट दोन महिन्यांपासून बंद होता. त्यामुळे चोरट्यांनी अतिशय शांत डोक्याने तसेच संपूर्ण माहिती घेऊन चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
‘लेक रेसिडेन्सी’ अपार्टमेंटमध्ये सिंधी कॉलनी येथील संत बाबा हरदासराम हिंदी हायस्कूलमधील सेवानिवृत्त शिक्षिका मधुबाला बाळकृष्ण जोशी (वय ६३) राहतात. त्या सन २०११ मध्ये सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचा मुलगा राहुल हा दिल्ली येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर मुलगी पुण्यात राहते. जोशी या जळगावातील फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. मे २०१७ रोजी त्या दिल्ली येथे मुलाकडे गेल्या होत्या. त्या दिवसापासून त्यांचा फ्लॅट बंद होता. सोमवारी दुपारी वाजता त्या रेल्वेने जळगावात अाल्या. घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी शेजारच्यांना सोबत घेत घरात प्रवेश केला. या वेळी त्यांच्या घरातील स्वयंपाकघर, दोन बेडरूममधील कपाटांचे ड्रॉवर तोडलेले घरातील साहित्य अस्ताव्यस्त केलेले दिसले. त्यावरून घरात चोरी झाल्याचा त्यांना अंदाज आला. घरातील अवस्थापाहून त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह पथक दाखल झाले. त्यांनी घरातील बाहेरील परिस्थिती पाहून नंतर मेहरूण तलाव, तांबापुरा भागात जाऊन चौकशी केली. तसेच चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तू, कपाटांवरील हातांचे ठसे घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
महिनाभरापासून घरातील दिवे सुरू : लेकरेसिडेन्सीमध्ये १६ फ्लॅट आहेत. त्यातील बंद तर फ्लॅटमध्ये रहिवासी आहेत. जोशी या दुसऱ्या माळ्यावर राहतात. त्यांना बाहेरगावी जाऊन दोन महिने झाले होते; परंतु महिनाभरापूर्वीच त्यांच्या घरातील दोन खोल्यांमधील दिवे पंखे सुरू होते. जोशी यांच्याकडूनच दिवे सुरू राहिले, असे वाटल्यामुळे शेजारच्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले; परंतु, आपण सर्व दिवे, पंखे बंद करूनच बाहेर गेलो, असे जाेशी यांनी सांगितले. त्यामुळे महिनाभरापूर्वीच चोरट्यांनी त्यांच्या घरात चाेरी केल्याचे समोर येते आहे.
 
असा आहे चोरीस गेलेला ऐवज
जोशी यांना भिशी लागल्यामुळे त्याचे ५० हजार रूपये घरात होते. या शिवाय त्यांनी लाख रूपये बँकेतून काढले होते. तर लाख रूपये आधीच घरात होते. म्हणजेच त्यांच्या घरात अडीच लाख रुपयांची रोकड होती. तसेच ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची कंठी, ग्रॅम वजनाचे कानातले, १२ ग्रॅम वजनाच्या तीन अंगठ्या चांदीचे ग्लास असा एकूण लाख ३४ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. तसेच चोरट्यांनी देवघराच्या मागे ठेवलेली काही रक्कमही चोरून नेली आहे.
 
महिनाभरापासूनच नवीन सुरक्षारक्षक
लेकरेसिडेन्सीमध्ये महिनाभरापूर्वीच वावडदा येथील राजेंद्र गोपाळ हा नवीन सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. तो कुटुंबासह तेथे रहात आहे. या रेसिडेन्सीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरट्यांना चांगलेच फावले. जोशी यांच्या फ्लॅटला दोन दरवाजे आहेत. यातील एकच दरवाजाला कुलूप लावले होते. स्लॅच डोअरची किल्ली फिरवण्यास कठीण जात असल्यामुळे त्यांनी दरवाजा बंद केला नव्हता. त्यामुळे देखील चोरट्यांना चोरी करणे सोपे गेले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...