आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: बनावट चावीने घर उघडून 44 हजारांचा ऐवज लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गणेशकॉलनी परिसरातील धन्वी अपार्टमेंटमधील बंद घर गुरुवारी दुपारी ते वाजेच्या दरम्यान बनावट चावीने उघडून चोरट्यांनी सोन्याची साखळीसह दागिने असा ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 
 
भाग्योदय सोसायटीतील धन्वी अपार्टमेंट येथे विजय रामदास दोरकर यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. यानंतर सोने-चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन पोबारा केला. गुरूवारी घरी परतल्यानंतर दोरकर कुटुंबियांना दार उघडलेले दिसले. चाेरट्यांनी ४० हजार किंमतीची एक सोन्याची साखळी, पदक चांदीचा ग्लास, चांदीच्या पाटल्या, एक हजार रूपये असा एकूण ४४ हजारांचा ऐवज लंपास केला अाहे. दोरकर यांनी जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळ भेट देत पाहणी केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...