आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारील घरांना कड्या लावून केली घरफोडी, जळगावात चोरांचा धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शेजारील नागरिकांच्या घरांना बाहेरून कड्या लावून चोरट्यांनी भाडेकरू अभियंत्याच्या घरात डल्ला मारल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री मीराबाईनगरात घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर संबंधित भाडेकरू अभियंता नाशिक येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने त्यांच्या घरातून किती ऐवज चोरीला गेला हे स्पष्ट झाले नाही. 
 
मीराबाईनगरातील प्लॉट क्रमांक २७ मध्ये योगेश आत्माराम पाटील यांचे समर्थ कृपा हे दुमजली घर आहे. तेे वरच्या मजल्यावर कुटुंबीयांसोबत राहतात. तर खालील खोल्यांमध्ये पावर ग्रीडमध्ये अभियंता असलेले सागर सुरेश हिंगुरकर हे भाडेकरू राहतात. गेल्या २० ते २५ दिवसांपासून ते प्रशिक्षणासाठी मुंबईला तेथून नाशिक येथे गेलेले आहेत. त्यांची पत्नीही माहेरी गेली आहे. तेव्हापासून त्यांचे घर बंद आहे. चोरट्यांनी घराच्या बंद असलेल्या गेटवरून आत उडी मारली. हिंगुरकर राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरील योगेश पाटील, शेजारील नाना नगराळे तसेच शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. घराचे कुलूप सफाईदारपणे कापून आत प्रवेश करून घरफोडी केली. सकाळी वाजता योगेश पाटील यांच्या पत्नी उठल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यांना बाहेरून कडी लावलेली आढळून आली. त्या वेळी पाटील यांनी शेजाऱ्यांना मोबाइलवर संपर्क साधून कडी उघडण्याची विनंती केली. त्यांनीही त्यांच्या घराची कडी बाहेरून लावण्यात आल्याचे सांगितले. शेवटी एका शेजाऱ्याने दरवाजाची कडी उघडली. त्यानंतर ही घरफोडी उघडकीस आली. 
 
घरातील लाइट, पंखे सुरू करून गेले : मंगळवारी या घराजवळ महिला रात्री वाजेपर्यंत बाहेर बोलत उभ्या होत्या. त्यानंतर हा प्रकार घडलेला आहे. त्याचप्रमाणे या घराच्यासमोर थोड्या अंतरावर असलेल्या बंद घराचेही चोरट्यांनी कुलूप तोडले अाहे. एकंदरीत हा दरोड्याचा प्रकार असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच चोरट्यांनी जाताना मागचा दरवाजा, पंखे लाइट सुरू करून पोबारा केला. 
 
पोलिसांबरोबर मनपावरही नाराजी 
शहरापासून दूर असलेल्या मीराबाईनगर भागात पोलिसांकडून रात्रीची नियमित गस्त घालण्यात येत नाही. त्यामुळे या भागात चाेऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेला हा दरोडा टाकण्याचा प्रकार होता. दरोडेखोरांना कदाचित कुणी पाहिले असते तर अनुचित प्रकार घडू शकला असता. पोलिसांबरोबर मनपाकडूनही या भागाला सापत्न वागणूक देण्यात येते. या भागात गटारी तुंबलेल्या आहेत. साफसफाई करण्यात येत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. 
 
पंचमुखी हनुमान मंदिराजवळील मंजुळा निवासातील रहिवाशी धनश्री बागुल या युवती साेमवारी सायंकाळी बहिणाबाई उद्यानासमोर दुचाकी लावलेली होती. सायंकाळी ७.१५ ते वाजेच्या दरम्यान चोरट्याने दुचाकीच्या डिकीतून पर्स चोरून नेली. यात हजार ५०० रूपये राेख, दीड हजार रूपयांचा चांदीचा तुकडा, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, बँक पासबुक इतर कागदपत्रे असा ११ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...