आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावमध्‍ये दरोडा; मुलांना जीवे मारण्याची धमकी, मानेवर चाकू ठेऊन लुटले साेने, पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंप्राळा परिसरातील गणपतीनगरामध्ये चोरी झालेल्या बंगल्याची पाहणी करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे पोलिस अधिकारी. - Divya Marathi
पिंप्राळा परिसरातील गणपतीनगरामध्ये चोरी झालेल्या बंगल्याची पाहणी करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे पोलिस अधिकारी.

जळगाव - पिंप्राळा परिसरातील गणपतीनगरामध्ये विरळ वस्तीत असलेल्या एका घराचा मागचा दरवाजा ताेडून पाच दराेडेखाेरांनी बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दराेडा टाकला. दराेडेखाेरांनी अर्धा तास घरात दहशत निर्माण करीत धुमाकूळ घातला. एवढेच नव्हे तर झाेपेत असलेल्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत कुटुंबीयांच्या मानेवर चाकू ठेऊन लाॅकर कपाटातील साडेसात ताेळे साेने ३१ हजार राेख रुपये, असा लाख ३६ हजारांचा एेवज लुटून नेला. तसेच फ्रीजमध्ये ठेवलेली माशांची भाजी, पाेळी पाण्याचे भांडे देखील ते साेबत घेऊन गेले.

 

गणपतीनगरात सुरेश रमेश पाटील यांचे रो-हाऊस आहे. ते घाणेकर चाैकातील सुनील इमिटेशन एंटरप्रायझेस इमिटेशन ज्वेलरीमध्ये काम करतात. त्यांच्याकडे आठवडाभरापूर्वी त्यांचे अमरावती येथील चुलत भाऊ अनिल पाटील, त्यांची पत्नी सोनू दीड वर्षाची मुलगी सुकन्या हे अाले आहेत. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर सुरेश पाटील त्यांचे कुटुंबीय बेडरूममध्ये झोपले होते. तर अनिल पाटील त्यांच्या कुटुंबीयांसोबत हॉलमध्ये झोपलेले होते. मध्यरात्री २.३० वाजता दराेडेखाेर शिडीच्या साहाय्याने संरक्षण भिंतीच्या आत आले. त्यांनी घराच्या मागील बाजूचा बंद असलेल्या दरवाजावर जोरात लाथ मारली. त्यामुळे दरवाजाचा कडी- कोयंडा तुटून खाली पडल्याने खाडकन आवाज झाला. ताे एेकून सुरेश पाटील यांना जाग आली. त्या वेळी दोन दरोडेखोर घरात आलेले होते तर तीन बाहेर उभे होते. एकाने कमरेला तर दुसऱ्याच्या हातात चाकू होता. सावरण्याच्या आतच चड्डी, बनियानवर असलेल्या एका दरोडेखोराने त्यांच्या मानेवर चाकू ठेवत त्यांना पुन्हा बेडवर झोपवले. त्यानंतर पाटील यांची पत्नी प्रिया यांना दरोडेखोरांनी उठवले. आवाज केल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत होते. मात्र,ते हिंदी भाषिक वाटत नव्हते.

 

 

हॉलमध्ये कोण झोपले आहे, याबाबत विचारणा करून दराेडेखाेरांनी अनिल पाटील यांनाही उठवले. दुसऱ्या दरोडेखोराने त्यांच्या मानेवर चाकू लावला. दरोडेखोरांनी बेडरूम, किचन हॉल धुंडाळला. तसेच सुरेश पाटील यांची पत्नी प्रिया यांना पैसे, दागिने कोठे ठेवले, याबाबत विचारणा केली. त्यांनी लॉकर कपाटात ठेवले असल्याचे सांगितल्यानंतर दरोडेखोरांनी लॉकरची चावी मागितली. मात्र, ती मिळून आल्याने त्यांनी टॅमीच्या साहाय्याने कपाटाचे लॉकर तोडून त्यातील दागिने ३१ हजार रुपये रोख ताब्यात घेतले. त्यानंतर अनिल पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील पर्समधील सहा हजार सोन्याचे दागिनेही लुटले. या घटनेत दराेडेखाेरांनी दाेन ताेळ्याची पाेत, ग्रॅमची साेनसाखळी, ताेळ्याचे गळ्यातील पाेत, ताेळ्याची पाेत, दीड ताेळ्याची साेनसाखळी असे ७.४ ग्रॅमचे साेने लंपास केले अाहे.

 

दरोडेखोर स्थानिक असल्याचा अंदाज : दरोडेखोरांपैकीएकाने चड्डी, बनियान घातलेली होती. त्यामुळे ती चड्डी, बनियान टोळी असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर या टोळीवर संशय जावा म्हणून मुद्दाम चड्डी, बनियान घालून आलेला असण्याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. मात्र, दरोडेखोर स्थानिक असल्याबाबत पोलिसांचा अंदाज अाहे.


घराबाहेर जाऊन साथीदारांशी चर्चा
दरोडाटाकताना एक दरोडेखोराने दोन वेळेस घराबाहेर जाऊन साथीदाराशी चर्चा केली. त्या सर्वांना एकजण सूचना देत होता. त्यांना ते सर म्हणत हाेते. दरोडा साध्य झाल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या दरोडेखोरांनी एकाला घरात जेवण आहे का? असे विचारले. त्यामुळे दराेडेखाेराने फ्रीज उघडून त्यात ठेवलेली माशांची भाजी, पाेळ्या पाण्याचे भांडे सोबत घेऊन धूम ठाेकली. रात्री वाजून मिनिटांनी पाटील यांनी रामानंदनगर पोलिसांना दरोड्याबाबत माहिती दिली. त्यानंतर पहाटे वाजता पोलिस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फिंगर प्रिंट एक्सपर्टने घरातील हाताचे ठसे घेतले आहेत. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान,पोलिसांना माहिती देऊनही ते एक तास उशिरा अाल्याने पाटील कुटुंबीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

 

घरात खेळताना पडल्याने थांबले
सुरेश पाटील यांचे भाऊ वहिनी बुधवारीच अमरावतीला जाणार होते. मात्र, हॉलमध्ये मुलीसोबत खेळत असताना ते पडल्याने त्यांच्या कमरेला दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी अमरावतीला परत जाण्याचे टाळले. सायंकाळी त्यांना पाहुणचारासाठी मासे अाणले हाेते. जेवण झाल्यानंतर उरलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवण्यात आली होती.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, दरोडेखोरांच्या दहशतीत मुले...

 

बातम्या आणखी आहेत...