आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेहननगरात घरफोडी; लाखाचा ऐवज लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाबळ परिसरातील माेहननगरात रविवारी सायंकाळी ते साेमवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान चाेरट्यांनी कुलूप ताेडून घरफाेडी केली. यात चाेरट्यांनी घरातील लाख २० हजारांचा एेवज लंपास केला अाहे. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीच्या गुन्ह्याची नाेंद करण्यात अाली अाहे. 
 
माेहननगरातील प्लाॅट क्रमांक ९६ येथे गाेपाळ रामदास सुतार यांच्या मालकीचे घर अाहे. या घरात चार भाडेकरू राहतात. त्यातील महावितरण कंपनीचे निवृत्त कर्मचारी नारायण सुकदेव तांबे (वय ६३) हे मुलगा राहुल (वय ३२) अाणि पत्नीसह राहतात. रविवारी त्यांच्या भावाकडे जागरण-गाेंधळाचा कार्यक्रम हाेता. त्यामुळे नारायण तांबे अाणि त्यांच्या पत्नी रविवारी दुपारीच अयाेध्यानगरात गेले हाेते, तर मुलगा राहुल रविवारी सायंकाळी वाजता कार्यक्रमस्थळी गेला हाेता. रविवारी रात्री उशीर झाल्याने तांबे कुटुंब अयाेध्यानगरात नातेवाइकाच्या घरी झाेपले. साेमवारी सकाळी ६.३० वाजता घरी परत अाले. 

मात्र, त्या वेळी दरवाजाला कुलूप नव्हते. त्यांनी घरात जाऊन बघितले तर लाेखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. चाेरट्यांनी कपाटातील लाॅकरमध्ये ठेवलेली ताेळे वजनाची साेनसाखळी अाणि २०० रुपये राेख असा एकूण लाख २० हजार रुपयांचा एेवज लंपास केला. मात्र, रामानंदनगर पाेलिसांत जुन्या किमतीप्रमाणे ५९ हजार ९०० रुपयांचा एेवज चाेरल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. दरम्यान, घरात चाेरी केल्यानंतर चाेरट्यांनी घराला लावलेले कुलूपही साेबत नेले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...