आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबासोबत राहून महिला करू शकतात जॉब

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मॅकेंजी अँण्ड कंपनीने ‘वूमन मॅटर : इन एशियन पर्सपॅक्टिव्ह’ नावाचा रिपोर्ट तयार केलेला आहे. त्यात बहुतांश महिला परिवाराला वेळ देण्यासाठीच नोकरी सोडतात. भारत, कोरिया व जपान सारख्या देशात 50 टक्के महिलांचे नोकरी सोडण्याचे कारण परिवाराची जबाबदारी असणे हेच आहे. परंतु महिलांसाठी काही नोकर्‍या अशा आहेत, की त्या घरबसल्या देखील करू शकतात. यात दिवसभर 6 तास कामासाठी वेळ द्यावा लागतो. घर बसल्या ऑनलाइन वेब सपोर्ट सर्व्हिस, फ्रीलांस रिपोर्ट रायटिंग, ऑनलाइन ट्युशन, सर्व्हिस सेक्टर कॉल सेंटर संबंधित कामही त्या करू शकतात. त्याचप्रमाणे ही सगळी कामे ते घरच्या घरीही करू शकतात. ऑनलाइन वेब सपोर्ट सर्व्हिसच्या अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारीला कंपनीच्या वेबसाइटमध्ये लॉग इन करून उत्तर देऊ शकतात.
ऑनलाइन वेब सपोर्ट जॉब
कॉल सेंटरमध्ये सुद्धा काही नवीन प्रकारचे जॉब सुरू झाले आहेत. यात महिला घरबसल्या काम करत आहेत. यात ऑनलाइन वेब सपोर्ट ही सगळ्यात नवीन संकल्पना आहे. या अंतर्गत कॉल सेंटर ज्या कंपन्यांची कामे घेतात, त्यांच्या ग्राहकांच्या तक्रारी, समस्यांना पटकन उत्तर दिले जाते. या व्यतिरिक्त इमेलद्वारे देखील उत्तर दिले जाते.
आयटी सेक्टरमध्ये संधी
आयटी कंपन्यांना आपल्या ग्राहकांना नवीन प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी मेल किंवा कॉलिंग सर्व्हिसची गरज असते. अशा सर्व्हिससाठी महिलांना निवडण्यात येते. यासाठी महिला विवाहित आहे की नाही, हे महत्त्वाचे नसते. पात्र महिलांना आयटी क्षेत्रात खूप नोकरीच्या संधी आहेत. वेळ आणि गरजेनुसार त्यांच्यासाठी नोकरी उपलब्ध आहे.
एचआर कंपन्यांकडे नोकरीचे अनेक पर्याय
> पब्लिशिंग हाऊससाठी हिंदी-इंग्रजी, भारतीय भाषात भाषांतराचे काम.
> कॉल सेंटर जॉब हे पाच ते सहा तासांच्या शिफ्टचे आहेत.
> परदेशातील नामांकीत कंपन्यांसाठी ऑनलाइन वेब सपोर्ट नोकरी.
> कंपन्यांचे ऑनलाइन सर्वेचे काम घरबसल्या स्वत: घेऊ शकतात.
> ऑनलाइन मार्केटिंग जॉब, सोशल मीडियाच्या माध्यमातून.
> महिलांना ऑनलाइन ट्युशनची संधी.