आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास व्यावसायिक वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पुरवठाविभागाने शहरातील एका हातगाडीचालकाने घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर केल्यामुळे गुन्हा दाखल केला. शहरात शेकडो हातगाड्यांवर घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर सुरू असतानाही अधिकाऱ्यांनी मात्र चमत्कारीकरीत्या एकच कारवाई केली, तर वर्षभरात केवळ दोनच कारवाई केल्या आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हातगाडी, हॉटेल्सचालकांवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या अनुषंगाने ‘दिव्य मराठी’ने तहसीलदार कार्यालयाचे पुरवठा तपासणी अधिकारी दीपक कुसकर यांना कारवाईसंदर्भात थेट प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी असमाधानकारक तसेच विषयाला धरून नसलेली उत्तरे दिली. एकंदरीतच पुरवठा विभाग सोयीनुसार कारवाई करीत असल्याच्या संशयाला त्यांनी दुजोरा दिला.

यांच्यावर गुन्हा दाखल
गुजरालपेट्रोल पंपाजवळील मयूरेश्वर कॉलनी येथील प्रकाश गोटू डांगी या हातगाडीवाल्याने घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर केल्यामुळे त्याच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुरवठा तपासणी अधिकारी दीपक सखाराम कुसकर यांनी सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. डांगी यांना अटक केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली होती.

अशी होते सेटिंग
पुरवठानिरीक्षकपदावर नवीन अधिकारी आला की, वचक निर्माण करण्यासाठी सहा महिन्यांतून एखाद-दुसरी कारवाई केली जाते. कारवाईनंतर धास्तावलेल्या हॉटेल्सचालकांकडून चिरिमिरी घेण्याचे प्रकार सुरू होतात. त्यानंतर पुन्हा ६-८ महिन्यांसाठी सर्वांना अभय दिले जाते. पुरवठा विभागातीलच एका वरिष्ठ अधिकारी तसेच काही कर्मचाऱ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली आहे.
दीपक कुसकर यांना थेटसवाल
प्रश्न- तीनदिवसांपूर्वी आपण घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हातगाडीचालकांवर कारवाई केली का?
उत्तर- होय,नुसती कारवाईच नाही तर गुन्हा दाखल केला.
प्रश्न- वर्षभरातअशा किती कारवाया झाल्या?
उत्तर- आतापर्यंतफक्त दोनच कारवाया झाल्या आहेत.
प्रश्न- एवढ्याकमी कारवाया का झाल्या?
उत्तर- तसेकाही नाही, आता आचारसंहिता लागली आहे. म्हणून इतर कामे करावी लागत आहेत.
प्रश्न- आचारसंहितालागून आता पाच दिवस झालेत, उर्वरित वर्षभराचे काय?
उत्तर- दोषीआढळून आले की, कारवाई सुरू असतात.
प्रश्न- दिवाळीच्यापार्श्वभूमीवर वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने कारवाई होत असल्याचा आरोप तुमच्यावर होतो आहे, हे खरे आहे का?
उत्तर- नाही.आमच्या कारवाया पुढेही सुरूच राहणार आहेत.