आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Housing Fraud Case In Jalgaon Hand Over To New Judge

नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्याच्या खटल्याचे न्यायाधीश बदलले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव नगरपालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याचा खटला विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांच्याकडून काढून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. क्षीरसागर यांच्या न्यायालयात वर्ग करण्याचा निर्णय मुख्य जिल्हा न्यायाधीश इंदिरा जैन यांनी सोमवारी घेतला.

दीक्षित यांच्या न्यायालयातून खटला काढण्याची सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. याप्रकरणात आमदार सुरेश जैन, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक राजकीय नेते आरोपी आहेत.
सरकार पक्षाने न्यायालयात दाखल केलेला विनंती अर्ज न्यायालयाने मान्य करून दीक्षित यांच्याकडून खटला काढून घेतला. जिल्हा न्यायाधीश वर्ग-2 दोन एन. आर. क्षीरसागर यांच्याकडे पुढील कामकाजासाठी वर्ग करण्याचे आदेश दिलेत. त्या शिवाय पुढील कामकाजासाठी तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्षीरसागर यांचे न्यायालयात 6 मार्च रोजी सर्वांनी हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे खटल्याचे कामकाज आता क्षीरसागर यांच्या न्यायालयात होणार आहे. या निकालाचे कार्यपालन आदेश जिल्हा न्यायाधीश जैन यांनी सोमवारीच सर्व पक्षकारांच्या वकिलांना बोलावून त्यांचे समक्ष न्यायालयात जाहीर केला.

कोर्टाबाहेर गर्दी
हा खटल्याबाबत आदेशाचे लेखी निकालपत्र सोमवारी संध्याकाळी जारी करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश खटला वर्ग करण्याबाबतचा निकाल सोमवारी जाहीर करणार असल्याने न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी जमा झाली होती.
सरकार पक्षाची मागणी मान्य
घरकुल घोटाळ्याच्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कलम लागू असल्याने खटला लाचलुचपत कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांची नेमणूक झाली. त्यांनी न्यायाधीश दीक्षित यांच्यावर अविश्वास दाखवत हा खटला दुस-या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. ता आरोपींच्या वकिलांनी खटला दीक्षित यांच्या न्यायालयातच सुरू ठेवावा, अशी मागणी केली होती.