आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घाेटाळा : सिंधू काेल्हेंवर धुळे काेर्टात अाराेप निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - माफीचा साक्षीदार व्हायला नकार देणाऱ्या माजी नगराध्यक्षा सिंधू काेल्हे यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात बुधवारी अाराेप निश्चित करण्यात अाले. बेकायदेशीर ठरावांना मंजुरी देणे अाणि गैरव्यवहाराच्या कटात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत त्यांना अाराेपी करण्यात अाले. दरम्यान, तपास अधिकारी नंदकुमार ठाकूर यांनी काेल्हे यांना दिलेल्या नाेटिसीमुळे अाराेपी पक्षाने न्यायालयात तक्रार केली.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अार. अार. कदम यांच्यासमाेर बुधवारी कामकाज झाले. जळगाव घरकुल प्रकरणात सिंधू काेल्हे यांच्याविराेधात अाराेप निश्चित करण्यात अाले. या अाराेपांचा काेल्हे यांनी इन्कार केला अाहे. जळगाव घरकुल प्रकरणातील अाराेपी सिंधू काेल्हे यांनी माफीचा साक्षीदार हाेण्यास नकार दिल्याने त्यांच्यािवराेधात न्यायालयात नियमित अाराेपी म्हणून कामकाज करण्यास सुरुवात झाली अाहे. दरम्यान, तपास अधिकारी ठाकूर यांनी काेल्हे यांना नाेटीस बजावून १४ सप्टेंबर राेजी न्यायालयात हजर राहण्याचे अादेश दिले हाेते. त्यासाठी सर्वाेच्च न्यायालय अाणि धुळ्याच्या विशेष न्यायालयाचा दाखला देण्यात अाला. याच पत्रावरून अाराेपी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात सरकार पक्षाला माहिती विचारली. अाराेपीला अशा पद्धतीने हजर करण्याचे अधिकार न्यायालयाला असताना तपास अधिकारी यांनी हा अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरला. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली. यावर अाता पुढील तारखेस निर्णय हाेण्याची शक्यता अाहे.

दरम्यान, न्यायाधीश अार. अार. कदम यांनी सिंधू काेल्हे त्यांच्यावर असलेल्या अाराेपाची माहिती दिली. काेल्हे यांनी नगरसेवक अाणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने घरकुल याेजनेचे चुकीच्या पद्धतीने ठराव पास केले. त्यामुळे ४७ काेटींचा घाेटाळा झाला. असे ठराव चुकीचे असल्याचे माहीत असूनही त्यांनी गुप्त कट केला, असे अाराेप ठेवण्यात अाले. मात्र या अाराेपांना काेल्हे यांनी नकार दिला. यानंतर त्यांच्या विराेधात अाराेप निश्चिती करण्यात अाली. अाता पुढील तारखेपासून अाराेपी म्हणून त्यांच्या विराेधात कामकाज चालविले जाणार अाहे. राजेंद्र मयूर, गुलाबराव देवकर, प्रदीप रायसाेनी अादी उपस्थित हाेते. याप्रकरणी पुढील कामकाज २० सप्टेंबरला हाेणार अाहे.
सुरेश जैन यांची अनुपस्थिती
या प्रकरणात कारागृहात असलेले एकमेव अाराेपी सुरेश जैन यांना सप्टेंबर राेजी सुप्रीम काेर्टाकडून जामीन मंजूर करण्यात अाला. त्यांची सुटका झाल्यानंतर बुधवारी प्रथमच विशेष न्यायालयात कामकाज झाले. मात्र, या वेळी सुरेश जैन यांच्यासह इतर काही अाराेपी न्यायालयात अनुपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...