आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घाेटाळा: काेचर लवादकावरून वाद-विवाद, अाज देणार विशेष न्यायालय निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - लवादक राजन काेचर यांनी दिलेला निवाडा लवादाच्या भूमिकेतून दिलेला असल्याने ताे सार्वजनिक दस्त ठरू शकत नाही. त्यामुळे न्यायालयात ताे सिद्ध करावयाचा असेल तर लवादक काेचर यांना न्यायालयात हजर राहावे लागू शकते, असा युक्तिवाद घरकुल घोटाळाप्रकरणी सरकार पक्षाकडून करण्यात अाला. याप्रकरणी जाेपर्यंत न्यायालयाकडून निकाल दिला जात नाही, ताेपर्यंत डाॅ.गेडाम यांची साक्ष घेऊ नये, अशी मागणी अॅड.धैर्यशील पाटील यांनी केली.

येथील विशेष न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश अार.अार.कदम यांच्या समाेर जळगाव घरकुल खटल्याचे कामकाज सुरू अाहे. त्यानुसार फिर्यादी डाॅ.गेडाम यांची उलटतपासणी घेण्यात येत अाहे. गुलाबराव देवकर यांच्यातर्फे अॅड.धैर्यशील पाटील यांनी सोमवारी उलटतपासणी घेतली. घरकुल घोटाळाप्रकरणी सरकारने स्थापन केलेला न्या.राजन काेचर लवादाने दिलेला निवाडा पुरावा म्हणून ग्राह्य धरून त्याला निशाणी लावण्यात यावी, त्याशिवाय अापल्याला पुढील उलटतपासणी करता येणार नाही, असे गुलाबराव देवकर यांचे वकील अॅड.पाटीलयांनी न्यायालयात सांगितले. मात्र, लवादाचा निवाडा हा सार्वजनिक दस्त नसल्याने ताे दाखविता येऊ शकत नाही. पुरावा कायद्यानुसार लवादाला वगळण्यात अाले अाहे. याबाबत उच्च न्यायालयाकडून देण्यात अालेल्या निकालाचा दाखला सरकार पक्षाकडून अॅड.एन.डी.सूर्यवंशी, अॅड.प्रवीण चव्हाण यांनी दिला. त्यामुळे लवादाचा निवाडा सिद्ध करण्यासाठी लवाद किंवा त्यावर ज्यांची सही अाहे त्यांनाच बाेलवावे लागेल, अशी बाजू मांडण्यात अाली. तर संशयितांच्या वकिलांकडून याबाबत न्यायालयाच्या निकालाची माहिती देत युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने दाेन्ही बाजू एेकून घेतल्या असून त्यावर उद्या मंगळवारी निकाल दिला जाणार अाहे. दरम्यान, सोमवारी अॅड.सागर चित्रे यांनी नगरसेवक अशाेक परदेशी यांच्यातर्फे गेडाम यांची उलटतपासणी घेतली. अॅड.जितेंद्र निळे यांनी शिवचरण ढंढाेरे, सरस्वती काेळी अाणि साधना काेकटा यांच्यातर्फे उलटतपासणी घेतली. गुलाबराव देवकर यांच्यातर्फे अॅड.धैर्यशील पाटील हे उलटतपासणी घेत अाहेत.

गेडाम यांनी डाेळ्यात टाकले अाैषध
उलटतपासणीच्या वेळेस डाॅ.गेडाम यांनी डाेळ्यात अाैषध टाकले. त्याला अॅड.सागर चित्रे यांनी अाक्षेप घेत त्यांनी न्यायालयाची परवानगी घेऊन अाैषध टाकणे गरजेचे असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, याबाबत न्यायालयाने त्यांना अाैषधाची गरज असल्याने त्यांनी ते घेतले असावे. यापूर्वीही अशा प्रकारचे अाक्षेप घेण्यात अाले अाहेत. त्या सर्वांची नाेंद मला घ्यावी लागेल, असे सांगितले.

साक्षीदारास उपस्थित ठेवण्याचे अादेश
याप्रकरणातफिर्यादी डाॅ.गेडाम यांची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण हाेण्याची शक्यता असल्याने सरकार पक्षाने पुढील साक्षीदारास न्यायालयात उपस्थित ठेवावे, अशी सूचना न्यायाधीश कदम यांच्याकडून सरकार पक्षाला करण्यात अाली. तर सरकार पक्ष काेणता साक्षीदार हजर करणार अाहे, त्याचे नाव अात्ताच न्यायालयाला सांगावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र, याबाबत काेर्टाने काेणतेही अादेश देता केवळ साक्षीदाराला उपस्थित ठेवण्याची सूचना केली.
बातम्या आणखी आहेत...