आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळा: रमेश जैनांवर गुन्हा दाखल करा, सरकार पक्षाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन, ईसीपी कंपनी, कंपनीचे संचालक सिद्धार्थ मयूर, राजेंद्र मयूर, अभियंता नारायण ललवाणी अाणि खान्देश बिल्डर्स यांना अाराेपी करावे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरकार पक्षाने विशेष न्यायालयात केली. त्यासाठी पुरावेही सादर केले. तसेच सरकार पक्षाने युक्तिवादही केला. याबाबत न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला असून त्यावर गुरुवारी कामकाज हाेईल.

जळगाव घरकुल घाेटाळा खटल्याचे मंगळवारी कामकाज झाले. या वेळी सरकार पक्षातर्फे ॲड.निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर. कदम यांच्यासमोर या खटल्यात फौजदारी संहितेचे कलम ३१९ अन्वये वाढीव आरोपींसाठी पुरावे सादर केले. पुराव्यांनुसार केलेल्या युक्तिवादात म्हटले की, आरोपी सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन यांच्या बँक खात्यात खान्देश बिल्डर्स कंपनीने ६० लाख रुपये जमा केले होते. त्यामुळे त्यांचाही घरकुल प्रकरणात सहभाग आहे. तसेच खान्देश बिल्डर्स कंपनीने घरकुल योजनेचे काम ईसीपी या कंपनीला दिले होते. त्यामुळेया दाेन्ही कंपन्या ईसीपी कंपनीचे संचालक सिद्धार्थ मयूर आणि इंजिनिअर नारायण ललवाणी अशा पाच जणांचा घरकुल घोटाळा प्रकरणात समावेश आहे. या पाचही जणांना आरोपी करावे. यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टापुढे माहिती सादर केली. त्यात बॅंकेच्या विविध नाेंदणींतून सदर पैसा कुठून काेणत्या खात्यात गेला अाहे? तसेच खान्देश िबल्डर्सने ठेका घेतला असताना ईसीपी कंपनीने त्यांच्याकडून उपठेका कसा घेतला? यातून हे सर्व कटकारस्थान ठरवून करण्यात अाले. यात इतरांनाही अाराेपी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी िवनंती न्यायालयाला केली. यावर आरोपींचे वकील सरकारी पक्षामध्ये युक्तिवाद होऊन न्या. कदम यांनी यासंदर्भातील सरकार पक्षाचा युक्तिवाद एेकून घेतला असून, त्याबाबतचा निर्णय राखीव ठेवला अाहे. त्यावर गुरुवारी, दि.७ राेजी न्यायालयाकडून निर्णय दिला जाणे अपेक्षित अाहे.

अधिकाऱ्यांना सूचना
याप्रकरणातील कागदपत्रे अाणि साक्षीदारांचे पत्ते मिळवून देण्यासाठी पाेलिस प्रशासनाने सहकार्य करावे. तसेच यासंदर्भात काही पुरावे, कागदपत्रे दाखल करावयाची असल्यास ते लवकरच दाखल करावे. घरकुलाचे कामकाज सुरू असेपर्यंत सरकार पक्षाच्या मदतीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी सूचना न्यायालयाकडून या खटल्याचे सध्याचे तपास अधिकारी अप्पर पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...