आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घाेटाळा: गेडामांची गैरहजेरी; न्यायालयाचे ताशेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जळगाव घरकुल घोटाळ्याच्या न्यायालयीन कामकाजासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम अर्ज देता गैरहजर राहिल्याने धुळे विशेष न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. तसेच कामकाजाच्या तारखा राज्य शासनाला कळवा, असे निर्देश तक्रारदार डॉ. गेडाम आणि विशेष सरकारी वकील एन. डी. सूर्यवंशी यांना विशेष न्या. आर. आर. कदम यांनी दिले आहेत. या खटल्याचे आता शुक्रवारी शनिवारी कामकाज होणार आहे.

अाैरंगाबाद खंडपीठाने बुधवारी डाॅ.गेडाम यांची उलटतपासणी घेण्याबाबच्या याचिका फेटाळल्या. त्यानंतर गुरुवारी धुळे न्यायालयात या खटल्याचे कामकाज होणार होते; परंतु उलटतपासणीसाठी डॉ. गेडाम अनुपस्थित राहिले. गैरहजर राहण्याबाबत गेडाम यांनी अर्ज दिला आहे का अशी विचारणा सरकारी वकील सूर्यवंशी यांना न्या. कदम यांनी केली. तशी कोणतीही पूर्वसूचना नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. गेडाम येत नसल्याने सरकारी वकील, संशयित आरोपी त्यांच्या वकिलांचा वेळ वाया जातो. त्यामुळे सरकारी वकील गेडाम यांनी कामकाजाच्या तारखा राज्य शासनाला कळवाव्यात. कामकाजाच्या दिवशी बैठक घेऊ नये, अशी सूचना या वेळी करण्यात आली. तसेच डॉ. गेडाम अनुपस्थित असतील त्या दिवशी सरकारी वकिलांनी साक्षीसाठी इतरांना बोलवावे. त्यांची नावे द्यावी, अशी सूचना या वेळी करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...