आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Housing Scam: Mouth Order Used In House Construction

घरकुल घोटाळा: तोंडी आदेशाने ‘घरकुल’चे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - जळगाव घरकुल याेजनेचे काम वास्तुविशारदांना देताना तोंडी आदेश देण्यात आले होते. उच्चाधिकार समितीने बेकायदेशीरपणे तसे निर्देश दिले होते. नगरसेवकांनीही बेकायदेशीर ठरावाला हरकत घेतली नाही; अन्यथा हा गुप्त कट पुढे सुरू झालाच नसता, अशी साक्ष आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बुधवारी धुळे न्यायालयात दिली.

जळगावचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची उर्वरित साक्ष बुधवारी विशेष न्या. आर. आर. कदम यांच्या समक्ष सुरू झाली. योजनेच्या कामासंदर्भात करण्यात आलेले ठराव ३२८, २७१, २७२, २७३, २३९ हे बेकायदेशीर होते. नऊ ठिकाणी सुरू असलेल्या योजनेच्या कामासाठी वास्तुविशारद काबरे-चौधरी, शिरीष बर्वे आणि प्रकाश गुजराथी यांना काम सोपविण्यात आले होते. त्यापैकी केवळ काबरे-चौधरी यांना तत्कालीन मुख्याधिकारी कोळी यांची स्वाक्षरी असलेले लेखी आदेशाचे पत्र मिळाले हाेते. तर शिरीष बर्वे आणि प्रकाश गुजराथी यांना उच्चाधिकार समितीचे तत्कालीन सभापती प्रदीप रायसोनी यांनी तोंडी आदेश दिले होते. योजनेच्या कामासाठी स्पर्धात्मकदृष्ट्या कोणतीही निविदा काढली नव्हती. अॅड.प्रवीण चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त डॉ. गेडाम हे आपल्या साक्षीतून उत्तर देत होते. त्यावर संशयितांच्या वकिलांनी हरकती घेतल्या.

काबरे-चाैधरींबराेबर १३ पानांचा करारनामा
ठरावक्रमांक ३२८ हा २५ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. रजिस्टरच्या हजेरीपत्रकावरील पान नं. ३८ ते ४२ वर नगरसेवकांची हजेरी दाखविली आहे. २२ डिसेंबर १९९७ ला काबरे-चौधरी पालिका प्रशासनाशी संबंधित कागदपत्रे आहेत. तसेच १७ जानेवारी १९९८ रोजी वास्तुविशारद काबरे-चौधरी यांच्यासोबत सुमारे १३ पानांचा करारनामा झाला. त्यावर मुख्याधिकारी पी.डी.काळे यांच्या सह्या असल्याचे आयुक्त गेडाम यांनी नजरेस आणून दिले.