आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Housing Scam: Suresh Jain Get Permission For Medical

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरकुल घोटाळा: सुरेश जैनांच्या वैद्यकीय तपासणीला परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - तब्बलतीन तासांचा विरोध आणि युक्तिवादानंतर धुळे विशेष न्यायालयाने घरकुल घोटाळ्यातील संशयित माजी आमदार सुरेश जैन यांच्या तपासणीला अखेर परवानगी दिली. पोलिस अधीक्षक, वैद्यकीय बोर्डाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांना उद्या बुधवारी ही तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोटाच्या विकाराचे कारण नमूद करून सुरेश जैन यांच्या वतीने गेल्या आठवड्यात वैद्यकीय तपासणी आस्था हॉस्पिटलमध्ये तपासणी करावी, अशी विनंती केली होती. या अर्जावर मंगळवारी कामकाजाला सुरुवात झाली.विशेषसरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रवीण चव्हाण यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. जिल्हा रुग्णालयात ही तपासणी होऊ शकते असा मुद्दा सरकार पक्षाने मांडला. त्याला जैन यांचे वकील अकिल इस्माईल यांनी हरकत घेतली. जिल्हा रुग्णालयात गॅस्ट्रो अँटॉलॉजिस्ट विभाग तसेच उपकरण नाही. आस्था हॉस्पिटलमध्ये या विकाराचे तज्ज्ञ डॉक्टर उपकरण आहे, असे कारण त्यांनी नमूद केले. त्यावर अॅड. सूर्यवंशी चव्हाण यांनी जैन यांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून खरंच तपासणीची गरज आहे का? अशी तपासणी करण्याचे आदेश करावे, अशी विशेष न्या. आर. आर. कदम यांना विनंती केली. न्या. कदम यांनी यासाठी धुळे पोिलस अधीक्षक, वैद्यकीय मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आस्था हॉस्पिटलमध्ये विशेष तज्ज्ञांकडून तपासणी करावी. त्याचा अहवाल सोमवार (दि.१६)पर्यंत सादर करण्याचे आदेश सायंकाळी साडेसहा वाजता पारित केले.
शासकीय रकमेचा बुधवारी सकाळी भरणा केल्यानंतर आदेशाच्या तीन प्रती पोलिस अधीक्षक, वैद्यकीय मंडळ डॉक्टरांना देण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

धुळ्यातहीआणतील दबाव
खासगीरुग्णालयात जाऊन जैन पुन्हा आजाराचे कारण पुढे करून दाखल होतील. सेंट जॉर्जमध्ये त्यांनी दबाव आणून दोन वर्षे उपचाराचा बहाणा करून मुक्काम ठोकला. मुंबईत दबाव आणला जाऊ शकतो तर धुळ्यातही तसे घडू शकते, असा मुद्दा अॅड. चव्हाण यांनी मांडला. त्याला बगल देत अॅड. इस्माईल यांनी मागचे काढू नका, असे सांगून टाळले.

डॉक्टरांचीबनावट सही
जैनयांच्या यापूर्वीच्या तपासणीची कागदपत्रे, त्यातील त्रुटी अॅड. एन. डी. सूर्यवंशी अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. यापैकी काही कागदपत्रांमध्ये एका डॉक्टराची बनावट सही केली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पुन्हा तपासणी अहवालात फेरफार होऊ शकते, याकडे सरकार पक्षाने लक्ष वेधले नोटीस बजावण्याची सूचना केली. अॅड. इस्माईल यांनी सही खरीखोटी नंतर बघा कायदेशीर कारवाई करा पण आता या गोष्टीशी त्याचा संबंध येत नाही, अशी खुलासा वजा माहिती दिली.

फडणवीस,खडसे...
मंगळवारीहोणार असल्याचे ठरलेले असतानाही खडसे अनुपस्थित राहिले. बैठकीऐवजी ते रामटेक या निवासस्थानी बसले होते. जळगाव येथील आपला नियोजित दौरा आटोपून ते मंगळवारी सकाळीच मुंबईत आले. परंतु आजारपणामुळे ते बैठकीला जाऊ शकले नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

आवडतेअधिकारी निकषाबाहेर
मुख्यमंत्रीफडणवीस यांनी अधिका-यांची नियुक्ती करताना नवे निकष ठरविले आहेत. यानुसार हे अधिकारी पुन्हा मंत्री आस्थापनेवर काम करण्याच्या निकषात बसत नसल्याचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.

वजन वाढले कसे ?
जैनपोटाच्या विकाराने ते त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांना चालणे कठीण असल्याचे अॅड. इस्माईल यांनी सांगितले. त्यावर कागदपत्रांचा आधार घेत अॅड. चव्हाण यांनी मग जैन यांचे वजन वाढले कसे ? असा प्रश्न उपस्थित केला. अखेर आम्ही जैन यांना आपल्या समक्ष आणतो स्वत: बघा असे सांगितले.