आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - घरकुल प्रकरणातील संशयित अाराेपी माजी आमदार सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावरील निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने अाणखी महिनाभर राखून ठेवला. परिणामी जैन यांचा कारागृहातील मुक्काम वाढला अाहे. याबाबत सरकारपक्षाने साक्षीदार तपासण्याचे बाकी असल्याने एक महिन्याची मुदत न्यायालयाकडे मागितली हाेती. त्यानुुसार सर्व साक्षीदारांच्या तपासणीचे काम झाल्यानंतर जैन यांच्या जामिनाबाबत निर्णय देण्यात येईल, असे सांगून न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला अाहे. पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

घरकुल घोटाळा प्रकरणात सर्व संशयितांना जामीन मिळाला आहे. सुरेश जैन यांच्यातर्फे जानेवारी महिन्यात जामिनासाठी अर्ज करण्यात अाला होता. फेब्रुवारीमध्ये जामीन अर्जावर निर्णय देण्यापूर्वी सर्व साक्षीदार तपासणीची सूचना सर्वाेच्च न्यायालयाने धुळे येथील विशेष न्यायालयास केली होती. त्यासाठी नियमित कामकाज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होेते. त्यानुसार गेल्या दाेन-तीन महिन्यांपासून घरकुल खटल्याचे नियमित कामकाज सुरू अाहे. न्यायालयाने सर्व साक्षीदार तपासण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत िदली हाेती. मात्र, अद्यापही काही साक्षीदारांची साक्षहोणे बाकी आहे. याप्रकरणी जुलै रोजी सरकारपक्षाने कामकाजाची अपेक्षित माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली नव्हती. त्यामुळे कामकाज १२ जुलै रोजी ठेवण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जगदीशसिंह खेहर आणि न्या. शिवा कीर्तीसिंह यांच्या पीठासमोर कामकाज सुरू झाले. यात जैन यांच्यातर्फे अॅड. कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. जैन यांना २०१२मध्ये अटक झाली आहे, तेव्हापासून ते कारागृहात आहेत. महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले आहेत. त्यामुळे जैन यांना जामीन देण्याची विनंती सिब्बल यांनी न्यायालयाला केली. मात्र, या खटल्यात रेकॉर्डवरील दोन साक्षीदारांसह एकूण अजून सहा जणांची साक्ष बाकी असल्याचे सरकारपक्षाच्या वतीने सांगण्यात आले एक महिन्याची मुदत न्यायालयाकडे मागितली. सरकारपक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सर्व साक्षीदारांची साक्ष झाल्यानंतर जैन यांच्या जामिनावर निर्णय होईल, असे स्पष्ट करून पुढील सुनावणी महिनाभरानंतर म्हणजे १२ ऑगस्ट रोजी ठेवण्याचे निर्देश दिले. सरकारपक्षातर्फे अॅड. निशांत कंठेश्वरकर यांनी बाजू मांडली.

सहा जणांच्या साक्ष बाकी
घरकुलघाेटाळा प्रकरणातील रेकाॅर्डवर असलेल्या सिंधू कोल्हे अाणि या प्रकरणाचे तपासाधिकारी इशू सिंधू यांच्या महत्त्वाच्या साक्षी बाकी अाहेत. तसेच हुडकोचे अधिकारी जी. आर. पिल्ले, व्ही. सुरेश, राजकुमार खन्ना, तडकसे या रेकाॅर्डवर नसलेल्या बाहेरच्या अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवण्याचे कामही अजून बाकी आहे.
पुढेे वाचा... राजकीय कमबॅकबद्दल उत्सुकता
बातम्या आणखी आहेत...