आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात सावधपणे करा विजेपासून बचाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मान्सूनच्या आगमनाची चाहूल रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यातून लागली आहे. पावसाळ्यात वीज अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण अधिक असते. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अनेक घटनाही घडल्या आहेत. काही उपाययोजना केल्यास नागरिकांना आपला बचाव करता येऊ शकतो. म्हणून पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी महावितरणचे अभियंता पराग चौधरी यांनी उपाययोजना घ्यावयाच्या काळजी विषयी काही टिप्स दिल्या आहेत.
सर्वप्रथम पृथ्वीवरील सागर, नदी अथवा कालव्यातील पाण्याची उष्णतेमुळे वाफ होते. ही वाफ जास्त प्रमाणात झाल्यावर उंच आकाशात जाऊन तिचे ढगांमध्ये रुपांतर होते. आकाशात असे अनेक ढग जमतात कमी जास्त तापमानामुळे ते सतत इकडून तिकडे जागा बदलतात. या प्रत्येक ढगामध्ये वरील बाजूस निगेटिव्ह चार्ज तयार झालेला असतो, खालच्या बाजूने पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला असतो; या स्थितीला ऊर्जा असे म्हटले जाते. हे ढग इकडून तिकडे वाहत असताना अनेक ढग अतिशय वेगाने एकमेकांवर आदळतात आणि पॉझिटिव्ह चार्ज तसेच निगेटिव्ह चार्ज एकमेकांशी संपर्कात आल्याने जोरदार शॉर्टसर्किंट होऊन मोठा आवाज निर्माण होतो. आकाशात स्पार्क तयार होते. त्यालाच आपण वीज कडाडणे, असे म्हणतो. यात विजेचा जास्त प्रवाह असतो.
जेव्हा एखादा निगेटिव्ह चार्ज जास्त असलेला ढग पृथ्वीच्या अत्यंत निकट येतो, तेव्हा तो पृथ्वीवरील तसेच जमिनीवरील पॉझिटिव्ह चार्जकडे आकर्षिला जाऊन सदर वीज जमिनीवर कोसळते. यालाच आपण वीज पडली, असे म्हणतो. अशा पडणाऱ्या विजांमुळे जीवितहानी वित्तहानी होण्याची शक्यता अधिक असते.
घरावर वीज पडू नये यासाठी नागरिकांनी हे उपाय करावेत
- उंच इमारतीच्या सुरक्षिततेसाठी इमारतीवर लायटनिंग अरेस्टर बसवावे. हे त्रिशूलाच्या आकारासारखे असून वीज पडल्यास, विजेचा करंट यांच्यामार्फत संपूर्ण इमारतीवर जाता, तो जमिनीत सोडला जातो इमारत सुरक्षित राहते.
- इमारतीच्या पायथ्याशी लायटनिंग अरेस्टर नीट अर्थिंग करून घ्यावे. त्यात बेरनोव्हेट, सॉइलचा वापर करावा, यामुळे वीज जरी पडली तरी लायटनिंग अरेस्टरच्या साह्याने तत्काळ बेंटनोव्हेट सॉइलमध्ये लगेच डिस्चार्ज होईल जीवित वित्तहानी टळेल.
...अशी घ्या काळजी
विजा चमकताना उंच जागेवर अथवा इमारतीवर जाऊ नका
झाडाखाली किंवा झाडाच्या बुंध्यापाशी थांबू नका
हातात किंवा अंगावर धातू अथवा दागिने ठेवू नका
विजेची उपकरणे, अथवा टीव्ही संच, मोबाइल बंद करून ठेवावा
दूरध्वनी, संगणकही बंद ठेवावेत.
पाइप लोखंडाचे, धातूचे वापरले असल्यास शॉवर घेणे टाळावे
बातम्या आणखी आहेत...