आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ तासांमधून १६ तास शाळा चालवायची कशी? शिक्षक संघटनांचा शासनाला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी सहा तासांवरून आठ तास करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मांडला आहे. आता ज्या शाळा सकाळ दुपार अशा दोन विभागांत भरतात, अशा शाळांनी २४ तासांपैकी १६ तास शाळा कशी सुरू ठेवावी? हा मुख्य प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापक शैक्षणिक संघटनांनी शासनाला विचारला आहे. तसेच पालकांनाही हा प्रस्ताव चुकीचा असल्याचे वाटत आहे.

शनिवारी राज्य शासनाने हा प्रस्ताव समोर आणला. त्यावर राज्यपातळीवर अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने रविवारी शहरातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. या सर्वांच्याच मते मुलांना आठ तास शाळेत बसवणे योग्य नाही. तसेच प्रत्यक्षात ही गोष्ट करणेही शक्य होणार नाही, असे मत व्यक्त केले आहे. शासनाने मांडलेल्या प्रस्तावावर पालक, शिक्षक संघटना, नागरिकांकडून २३ नोव्हेंबरपर्यंत अभिप्राय मागवले आहेत. हे अभिप्राय शासनाच्या संकेतस्थळावर पाठवायचे आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबरनंतरच या प्रस्तावाचे काय होईल, हे ठरणार आहे.

मुलांना इतर उपक्रमांमध्येही सहभागी व्हायचे असते. शाळेच्या वेळेनंतर त्यांना इतर क्लासेस असतात. शिवाय आठ तास शाळा सुरू ठेवणे योग्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही मानसिक ताण येऊ शकतो. शासन बदलल्यानंतर नवीन नियम करतात. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होतात. -सुरेश पाटील,पालक

अाठ तास काम अशक्य
आमचीशाळा सकाळ दुपार या दोन विभागांत भरते. नवीन प्रस्तावानुसार अशा शाळांना आठ तास काम करणे शक्य नाही. २४ तासांतून १६ तास शाळा चालवणे शक्य नाही. शासनाचा प्रस्ताव योग्य नाही. डी.एस.सरोदे,मुख्याध्यापक, आर.आर. शाळा

कायद्याच्या विरोधातला प्रस्ताव
खासगीसेवा-शर्तींची नियमावली तयार आहे. त्यानुसार सध्या राज्यातील सर्व शाळा सुरू आहेत. यात शासनाने मध्येच असे निर्णय घेणे कायद्याला सोडून आहेत. सध्याचे शासन वेळकाढू धाेरण राबवत आहे. शासनाचा हा प्रस्ताव संघटनांना मंजूर नाही. शिवाय प्रत्यक्षात असे करणेही शक्य होणार नाही. एस.डी.भिरुड,सचिव, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ

या आहेत प्रमुख अडचणी
काहीशाळासकाळी दुपारी अशा दोन विभागांत चालतात. त्यामुळे सकाळ विभागाची सुटी दुपारची शाळा भरवण्याची वेळ निश्चित होणार नाही. ऋतुमानानुसार अनेकदा शाळेच्या वेळा बदलाव्या लागतात. त्यामुळे अडचणी वाढतील.

अनेकविद्यार्थीशाळा भरण्यापूर्वी किंवा सुटल्यानंतर खासगी शिकवणी, नृत्य, वादन, कराटे आदींची क्लासेस करतात. त्या मुलांना या क्लासेससाठी किंवा खेळण्यासाठी वेळच मिळणार नाही.
आठतासमुलांना शाळेत ठेवणे, म्हणजे हा त्यांच्यासाठी कोंडवाडा असल्याची भावना मुलांच्या मनात निर्माण होईल. परिणामी, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतील.

जबरदस्तीने शाळेत बसवल्यासारखे वाटेल
आधीचखासगी शाळांमध्ये पटसंख्या जास्त असते. त्यामुळे आठ तासांच्या वेळेत शाळा प्रशासनावर अधिक भार पडेल. मुलांना जबरदस्तीने शाळेत बसवल्यासारखे वाटेल. लवकर सुटी झाल्यास मुलांच्या इतर नैसर्गिक खेळ, उपक्रमांना वेळ मिळणार नाही. सुनीलपवार, शिक्षक, खडके विद्यालय
मानसिक ताण वाढणार