आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HSC Exam News In Marathi, Mahndra Write Paper In Ambulance, Divya Marathi

महेंद्रच्या जिद्दीला सलाम! संधीवात असतानादेखील रुग्‍णवाहिकेत दिला बारावीचा पेपर..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नूतन मराठा महाविद्यालयात बारावीत शिकणार्‍या महेंद्र काशिनाथ लोहार या विद्यार्थ्याने गुरुवारी चक्क महाविद्यालयाच्या परिसरात रुग्णवाहिकेमध्ये झोपून बारावीचा पहिला मराठीचा पेपर दिला. पेपर लिहिण्यासाठी त्याला रायटर गणेश रामकृष्ण लोहार याने सहकार्य केले. महेंद्र 2001पासून संधिवात या आजाराने त्रस्त असल्याने तो बसू किंवा उभा राहू शकत नाही.

13 वर्षांपासून संधीवाताने त्रस्त
28 व्या वर्षी महेंद्र देतोय परीक्षा
70 गुणांचा पेपर लिहिला महेंद्रने