आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुडकाेची कर्जफेड हाच आता पालिकेचा एकमेव अजेंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिल्लीच्या डीअारएटी काेर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे पालिकेची अब्रू वाचली असली तरी, अाता हाती असलेल्या २४ दिवसांत केवळ हुडकाेचे कर्जफेडीच्या दृष्टीने व्यूहरचना अाखणे एवढाच एकमेव अजेंडा ठरला अाहे. यासाठी अधिकाऱ्यांसाेबत पदाधिकारी देखील कायद्याच्या अभ्यासात गुंतले असून कर्जफेडीनंतरच विकास शक्य असल्याने भाजप नेत्यांचाही सल्ला घेतला जात अाहे.
तत्कालीन नगरपालिकेने हुडकाे या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या १४१ काेटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी अातापर्यंत २४८ काेटी अदा केले अाहेत. त्यानंतर हुडकाेने डीअारटी काेर्टाकडून मिळवलेल्या डिक्री अाॅर्डरमुळे पालिकेला ३४१ काेटी रुपये भरण्याचे अादेश केले हाेते. ते भरल्यास व्याजासह कर्जाचा अाकडा ५०० काेटींपर्यंत पाेहचला अाहे. एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने पालिका प्रशासनाने अाता कायद्याच्या लढाईनेच जिंकण्याचा निर्णय घेतला अाहे. गेल्या १५ दिवसांपासून पालिकेचे सर्वच वरिष्ठ अधिकारी एक ज्येष्ठ नेता दिल्लीत तळ ठाेकून हाेते. हुडकाेच्या प्रत्येक मुद्द्याला खाेडून काढण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची फळीच उभारण्यात अाली अाहे. राज्य शासनाकडून निधी मिळायचा तेव्हा मिळेल. परंतु पालिका कर्जातून मुक्त कशी हाेईल हेच एकमेव ध्येय निश्चित केले अाहे. विशेष म्हणजे या प्रयत्नांसाठी सत्ताधारीच नव्हे तर विराेधकांकडूनही अपेक्षित पाठबळ मिळण्याचे संकेत मिळत अाहेत.

नाकाबंदीचा प्रयत्न : पालिकेचेअार्थिक उत्पन्न १३५ काेटींपेक्षा जास्त नसताना मात्र दरवर्षींचा अर्थसंकल्प हा ८०० काेटींपेक्षा जास्त असताे. त्यामुळे पालिकेला मिळणारे उत्पन्न हे भरपूर असल्याचे चित्र निर्माण हाेते. त्याचा फायदा हुडकाे उचलत असल्याचा अंदाज अाता बांधला जात अाहे. त्याच दृष्टीने हुडकाेने डिक्री अाॅर्डरच्या माध्यमातून ३४१ काेटी भरण्याचे अादेश मिळवले हाेते. या अादेशाला स्थगिती मिळाल्यास पालिकेची सतरा मजली इमारत सील करून नाकाबंदी करण्याचा डाव हाेता; परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे डीअारएटी काेर्टात दिलासा मिळाला. अन्यथा पालिकेच्या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही प्रवेशद्वारापासून परतावे लागले असते. त्यामुळे संपूर्ण कारभारच ठप्प पडला असता.

कर्जफेडीसाठी प्रयत्न
^शहर प्रचंड अडचणीत अाहे. त्यामुळे सगळ्यात अाधी पालिका कर्जमुक्त करणे गरजेचे अाहे. यासाठी लवकरच एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव तयार करण्यात येत अाहे. त्या दृष्टीने अधिकारीदेखील कामाला लागले असून काेणतीही चूक राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रविवारी पालकमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेऊन वेळ मागणार अाहे. नितीनलढ्ढा, महापाैर

संयमाने खाविअाची वाटचाल
येणाराकाळ अाणखी अडचणीचा असल्याची जाणीव खाविअाला अाहे. त्यामुळे पालिकेची सत्ता हाती असल्याने त्या माध्यमातून किमान सेवा पुरवणे गरजेचे असल्याने भाजपविराेधात वक्तव्य करून नाराजी अाेढवून घेण्याची भूमिका स्वीकारण्यात अाली अाहे. यापूर्वीदेखील रमेश जैन नितीन लढ्ढा यांनी सकारात्मकता दाखवत विराेधाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले अाहे. त्यामुळे खाविअाच्या काेणत्याही नगरसेवकाने भाजप नेत्यांच्या बाबतीत काेणतेही वक्तव्य परस्पर करू नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात अाहे.