आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिज्ञापत्रातून हुडकाेची बनवेगिरी उघड करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कर्ज किती भरायचे? याबाबत चर्चा सुरू असताना उच्च न्यायालयातील याचिकेबाबत काेणतीही कल्पना देता डीअारटी काेर्टातून अादेश मिळवणाऱ्या हुडकाेची बनवेगिरी प्रतिज्ञापत्र सादर करून महापालिका निदर्शनास अाणून देण्यात येणार अाहे. त्यासाठी सखाेल प्रतिज्ञापत्र तयार करायचे असल्याने महापालिका उच्च न्यायालयाला मुदत मागणार अाहे. डीअारटी न्यायालयात ३४० काेटी भरण्याचा अादेश रद्दसाठी बाजू मांडण्यात येणार अाहे.

हुडकाे या वित्तीय संस्थेकडील कर्ज थकल्याप्रकरणी डीअारटी काेर्टाने नुकताच अादेश देत पालिकेला ३४० काेटी रुपये भरण्याचा अादेश केला अाहे. त्यामुळे हादरलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठली अाहे. डीअारटी काेर्टाच्या अादेशाला अाव्हान देणे हुडकाेचे चुकीचे वागणे निदर्शनास अाणून देण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची नियुक्ती करण्यात येत अाहे. पालिका अायुक्त संजय कापडणीस यांनी साेमवारी यासंदर्भात चर्चादेखील केली. सील प्रकरणात दाखल याचिकेत १५ राेजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी अाहे. या वेळी एकरकमी परतफेडीबाबत चर्चा सुरू असताना ती माहिती डीअारटी काेर्टात लपवून कसा अादेश मिळवला? हे निदर्शनास अाणून दिले जाणार अाहे. यासाठी पालिकेला सखाेल प्रतिज्ञापत्र तयार करावे लागणार अाहे. त्यात पालिकेने घेतलेले कर्ज त्याची परतफेड, भरण्याची तयारी, सुरू असलेली चर्चा याबाबत सर्वकाही माहिती नाेंदवले जाणार अाहे.

प्रतिज्ञापत्र देण्यासाठी मनपा वेळ मागणार
हुडकाेलाप्रस्ताव देऊनही त्यावर काहीही निर्णय घेतल्याने अडचणी वाढत अाहेत. हुडकाेलाही एकरकमी परतफेडीतून पैसा मिळवण्यापेक्षा पालिकेसमाेरील अडचणी वाढवण्यात रस असल्याचे थेट म्हणणे न्यायालयात मांडले जाण्याची शक्यता अाहे. डीअारटी काेर्टाने दिलेला अादेश रद्द करून मिळावा, याला पहिले प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात अाले. त्यामुळे बुधवारी पालिकेच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागून घेण्याची शक्यता अाहे.