आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक खाती गोठवल्याप्रकरणी मनपाला हायकोर्टाचा दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेच्या सर्व खात्यांतील रक्कम हुडकोला वर्ग करण्याच्या १६ सप्टेंबर रोजी दिलेल्या डीआरटीच्या आदेशाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली आहे.
न्या.व्ही.एम.कानडे व न्या.पी.डी.कोडे यांच्यासमोर ही सुनावणी होत आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाने पालिका प्रशासनाला काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. मंगळवारी सुनावणीत पालिका हा मुद्दा मांडणार आहे.
हुडकोच्या कर्जाचे हप्ते नियमित फेडले जात नसल्याच्या कारणावरून डीआरटीने ७ ऑक्टोबरपासून पालिकेची सर्व खाती गोठवली आहेत. त्यामुळे कर्मचा-यांचे दोन महिन्यांचे पगार-पेन्शन झालेले नसून प्राथमिक सुविधा देणेदेखील प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. हुडकोसोबत एकरकमी कर्जफेडीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून यासाठी कुठून व किती निधी उपलब्ध होणार, याची म‍ाहिती देऊनही डीआरटीने पालिकेला दिलासा मिळाला नव्हता. दीड महिन्यांपासून पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. डीआरटीत दिलासा मिळत नसल्याने पालिकेने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सोमवारी दुपारी ४ वाजता हे प्रकरण सुनावणीसाठी आले. स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांशी संबंधित विषय असल्याने उच्च न्यायालयाने तूर्त डीआरटीने पालिकेच्या बँक खाती गोठवण्यासंदर्भात १६ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. या निर्णायक पालिकेला दिलास मिळाला असला तरी ही रक्कम पगार व इतर अत्यावश्यक सुविधांसाठी खर्च करण्यासंदर्भात पािलका मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडणार आहे. पालिकेतर्फे अ‍ॅड. जितेंद्र गायकवाड यांनी कामकाज पाहिले.