आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रवाढीमुळे 495 कोटी, हुडकोकडून प्राप्त स्टेटमेंट पाहून पालिकाही चक्रावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील झोपडपट्टीधारकांच्या घरकुल उभारणीसाठी महापालिकेने हुडकोकडून टक्के व्याजदराने कर्ज घेतले होते. आतापर्यंत 200 कोटी फेड करूनही पालिकेवर 495 कोटी रुपये बाकी असल्याचा दावा केला जात आहे. एवढे कर्ज कसे फुगले? यासंदर्भात हूडकोने दिलेले 112 पानांचे स्टेटमेंट पाहून प्रशासनही चक्रावले आहे.

झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी पालिकेने हुडकोकडून वेळोवेळी 131 कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जापोटी पालिकेने आतापर्यंत सुमारे 200 कोटी रुपये भरले आहेत. डिसेंबर 2013 पर्यंत 135 कोटींचा आकडा सांगणाऱ्या हूडकोने आता आह आकडा ४९५ कोटी झाला असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त संजय कापडणीस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंटची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात ११२ पानांचे स्टेटमेंट हाती पडल्यावर याचा उलगडा पालिकेतील अधिकाऱ्यांना होत नव्हता. यासंदर्भात बाहेरील कर सल्लागारांची मदत घेतली असता, त्यांनाही हुडकोच्या आकडेवारीचा उलगडा होत नसल्याची स्थिती आहे. सावकारी कर्जापेक्षाही महागात पडणारी हुडकोची व्याजदर पद्धती पालिकेला झेपणारी आहे. त्यामुळे प्राप्त झालेल्या स्टेटमेंटवर युक्तिवाद करण्यापेक्षा एकरकमी कर्जफेड करून मोकळा होण्‍याचा पर्याय पालिका प्रशासनाला योग्य वाटत आहे. पालिकेतर्फे १४ ऑक्‍टोबर रोजी उच्च न्यायालयात होणा-या सुनावणी वेळी हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.
जिल्हा बँकेचे ५७ कोटी थकित
हुडकोच्याव्यतिरिक्त पालिकेने जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडूनही ५९ कोटी रुपये कर्ज घेतले होते. आतापर्यंत सुमारे ११५ कोटी रुपये फेड झाली आहे. मात्र, एवढे पैसे भरूनही पालिकेवर सुमारे ५७ कोटी रुपये कर्ज बाकी आहे. मात्र, हुडकाेप्रमाणे जिल्हा बँकेचे एकरकमी कर्जफेड करण्यासंदर्भात प्रशासनाच्या कुठल्याही हालचाली सुरू नाहीत.
कर सल्लागारही चक्रावले
हुडकोकडूनप्राप्त झालेल्या 112 पानांचे स्टेटमेंट व्यवस्थितरीत्या समजावून सांगण्यासाठी शहरातील दोन तज्ज्ञ कर सल्लागार यांना बोलवले होते. मात्र, हुडकाेने वेळोवेळी वापरलेले निकष, दिलेली आकडेवारी त्यांच्याही आवाक्याबाहेर जात होती. कुठल्या िनकषाने ही आकडेवारी दिली याचा थांगपत्ता लागत नसल्याने पालिका अधिकारी आणि कर सल्लागारही चक्रावले.