आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Rights Education, Guidance And Social Science

हक्क हाच मनुष्याच्या विकासाची ओळख, प्रा.डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आपल्या हक्कांबरोबरच इतरांमध्येही अधिकारांची भावना जागवणे, हीच मानवाधिकाराची संकल्पना असून, मानवी हक्क ही मनुष्याच्या विकासाची ओळख आहे. त्यामुळे आगामी काळात आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी लढाई लढावी लागणार असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांनी केले. डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘मानवी हक्क शिक्षण सामाजिकशास्त्रे’ या विषयावरील चर्चासत्राच्यावेळी ते बोलत होते.
मानवाला समाजाभिमुख बनवा
‘मानवीहक्क, शिक्षणाची आवश्यकता का आहे?’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेस गुरुवारी सुरुवात झाली. या वेळी बाेलताना डॉ.लवटे यांनी अांतरराष्ट्रीय स्तरावरील मानवाधिकारांची विविध उदाहरणे दिली. जपान, रशिया, ग्रीक, युरोपीय राष्ट्रे, अमेरिका भारत या प्रमुख राष्ट्रांमध्ये ‘मानवी हक्क शिक्षणाची बीजे कशी रोवली गेली याबाबतही माहिती दिली. समाजाला हक्कांची ओळख करून देणे, शांतता सहकार्याची भावना निर्माण करणे, समाजात विधायक परिवर्तन घडवून आणणे अाणि मानवी हक्कांचे संक्रमण करून मानवाला समाजाभिमुख मानवतावादी बनवणे, हा मानवी हक्क शिक्षणाचा प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डाॅ.एस.एस.राणे यांनी उपक्रमांची माहिती दिली. या वेळी सचिव एन.एच.चौधरी, समन्वयक प्रा.डॉ.व्ही.जे. पाटील अादी उपस्थित होते.

20 शोधनिबंध झाले सादर-
संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मूल्यांबाबत सांगितले पाहिजे. तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपली जबाबदारी नेमकी काय आहे? याची जाणीव करून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे डॉ.शाह आलम यांनी ‘मानसशास्त्रीय समस्या- समुपदेशन मानवी हक्क’ विषयावर मार्गदर्शन केले. यासह देशभरातील २० प्राध्यापकांनी आपले पेपर सादर केले. तिसऱ्या सत्रात मुंबई विद्यापीठाचे डॉ.नारायण भोसले यांनी ‘लिंग लिंगभेद’वर मार्गदर्शन केले. प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी सूत्रसंचालन केले. जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे.