आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपड्यात ऊस उत्पादकांचे थकित पेमेंटसंदर्भात उपोषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - चोपडा साखर कारखान्याकडील थकित पेमेंटसंदर्भात शनिवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. या वेळी शेतकऱ्यांनी संचालकांविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचा संताप पाहून कारखान्याचे चेअरमन व्हाइस चेअरमन यांनी उपोषणस्थळाला भेट देण्याचे टाळले.
सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे लाक्षणिक उपोषण संध्याकाळी वाजता शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील यांनी सहकारमंत्री, सहकार राज्यमंत्री महसूलमंत्री यांना भेटून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व आपण मुंबई भेटीत करणार असल्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यात आले. उपोषणास ऊस उत्पादक शेतकरी एस.बी.पाटील, डॉ.रवींद्र निकम, अॅड.शिवराज पाटील, अॅड.एस.डी.सोनवणे, प्रमोद झुलाल पाटील, संजय हिरामण पाटील, धनंजय पाटील, मेहमूद बागवान, किरणसिंग राजपूत यांच्यासह हजारो शेतकरी उपोषणास बसले होते.

३१ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम
यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी कारखान्याच्या आजी, माजी संचालकांना लक्ष्य केले. ३१ ऑगस्टपर्यंत उसाचे निम्मे पेमेंट दिल्यास तीव्र आंदोलन छेडून गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. तसेच घरात जाऊन मी पैसे काढून आणू शकतो, असे अॅड.सोनवणे यांनी सांगितले. बुलडाणा पतपेढीने २०३० रुपये दराप्रमाणे या अगोदरच चोसाकाला ४२ कोटी रुपये दिले होते. मात्र, संचालक मंडळाने त्या ४२ कोटींमधून शेतकऱ्यांची देणी देता दुसरे व्यवहार केलेत. म्हणून आजी, माजी संचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.

यांनी दिली भेट
उपोषणासमाजी आमदार कैलास पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, नगराध्यक्ष मनीषा चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, तहसीलदार प्रमोद भामरे, अॅड.संदीप पाटील, इंदिरा पाटील, आत्माराम म्हाळके, डॉ.राधेश्याम चौधरी, देवेंद्र सोनवणे, महेंद्र धनगर आदींनी भेटी दिल्यात.

उपोषणस्थळी पत्र
चोसाकाचेअरमन अॅड.घनश्याम निंबाजी पाटील संचालक मंडळ यांनी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पेमेंटसंदर्भात लेखी स्वरुपात अश्वासन दिले.

याबाबतच्या पत्रात म्हटले आहे की, चोपडा सहकारी साखर कारखान्याबाबत जो निर्णय साखर आयुक्त, पुणे यांनी दिला आहे. तो निर्णय रद्द करण्यासाठी आम्ही संचालक मंडळ प्रयत्न करीत आहोत. तरी आम्हाला ३१ ऑगस्टपर्यंत सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. पत्रावर चेअरमन, व्हाइस चेअरमन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१७ महिन्यांपासून कारखान्यातील कामगारांचा पगार थकित
आंदोलन| कारखान्याचे आजी - माजी संचालकांना केले टीकेचे लक्ष्य
चोसाका संचालकांनी गेली पाच वर्षे सत्तेवर राहून कारखान्याच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत. जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध असूनही संचालकांना कारखान्यासाठी कर्ज मिळवता आले नाही. बुलडाणा पतपेढीकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकित पेमेंट देण्याच्या सबबीखाली कर्ज काढले. तरीही गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या हक्काचा एक पैसाही या संचालकांनी दिला नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया अॅड.एस.डी.सोनवणे, एस.बी.पाटील (गणपूर) यांनी आयोजित लाक्षणिक अन्नसत्याग्रह आंदोलनादरम्यान व्यक्त केल्या.

चोसाका सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नाही. मात्र, शेतकऱ्यांना साखर मिळावी, म्हणून आंदोलन केले. सत्ताधारी मंडळाने ते मान्यही केले. परंतु, १७ महिन्यांपासून कारखान्यातील कामगारांचा पगार थकित आहे. तेव्हा त्यांचा पगार कमी करणे अव्यवहार्य आहे. तेव्हा तात्या, जिभाऊ यांनी नातीगोती बाजूला ठेवून कारखान्याच्या हितासाठी संघर्ष करावा, असे कॉ.अमृतराव महाजन यांनी या वेळी सांगितले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमळनेर तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील हे दिवसभर सहभागी झाले होते.