आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huny Bees Attacked On Govdavari School, Three Students Wounded

गाेदावरी स्कूलमध्ये मधमाश्यांचा हल्ला, तीन विद्यार्थी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल विद्यार्थी.
जळगाव - एमअायडीसी परिसरातील गाेदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तिसऱ्या मजल्यावर मधमाश्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

शाळा सुटूनही वरच्या मजल्यावरील विद्यार्थी खाली आल्याने एका शिक्षिकेने अर्जुन गाेपाल साेनार (वय १४, रा. बालाजीपेठ) याला शाळा सुटल्याचे सांगण्यासाठी पाठवले. अर्जुन निराेप सांगण्यासाठी जात असताना अचानक तिसऱ्या मजल्यावर मधमाश्यांनी त्याच्यावर हल्ला केला. तसेच त्या मजल्यावरील शिक्षकांनी तत्काळ दरवाजे बंद केले. तरीही उमर सलीम शेख (वय १५, रा. मेहरूण) अािण अयान फ‍िराेज खान (वय १४, रा. मेहरूण) यांनाही मधमाश्यांनी चावा घेतला. मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दुपारी वाजता उपचार केल्यानंतर त्यांना साेडून देण्यात अाले.

अनेक शाळांना धाेका
अनेकशाळांमधील इमारतींवर तसेच शहरातील उंच इमारतींवर मधमाश्यांचे पाेळे अाहे. गाेदावरी शाळेतील घटनेप्रमाणे इतर शाळांमध्ये ही घटना घडू शकते. त्यामुळे या मधमाश्यांच्या पाेळ्यांना वेळीच काढले पाहिजे. गाेदावरी शाळेत अजून काही ठिकाणी मधमाश्यांचे पाेळे अाहेत, ते काढून टाकावेत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

पाेळे काढणार होतो
अामच्याशाळेच्या इमारतीवर असलेले मधमाश्यांचे पाेळे अाम्ही काढणार हाेताे. याअगाेदरही अनेक वेळा काढले अाहेत. मात्र, अगदी कमी वेळात ते तयार हाेतात. त्यामुळे काही वेळा काढायचे राहून जातात. जखमी विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर अाहे. नीलिमाचाैधरी, मुख्याध्यापिका, गाेदावरी इंग्लिश मीडियम स्कूल