आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळालेल्‍या विवाहितेचा मृत्‍यू, पतीसह चौघे ताब्यात; सासरच्या लोकांनी पेटवून दिल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत वैशाली संतोष गाडे - Divya Marathi
मृत वैशाली संतोष गाडे
जळगाव- अादर्शनगरातील सूर्यकिरण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विवाहितेचा ९५ टक्के भाजल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. मात्र, तिला सासरच्या लोकांनी पेटून मारल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला. यामुळे दोन्ही कुटुंबीय रुग्णालयात समोरासमोर आल्यानंतर जोरदार वाद आणि मारहाणही झाली. पोलिसांनी तिच्या पतीसह सासू, सासऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वैशाली संतोष गाडे (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
 
वैशाली ही पती संतोष, आठ वर्षांची मुलगी ओजल अडीच वर्षांचा मुलगा सोहम यांच्यासह राहत होत्या. ती गुरुवारी सकाळी वाजता घरातच भाजली. या वेळी घरात पतीसह दोन्ही मुलेदेखील हजर होती. आग लागल्याच्या संशयाने शेजारी अारडा-आेरड करीत गाडे यांच्या घराबाहेर जमले होते. पती संतोषसह नागरिकांनी भाजलेल्या अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. ती ९५ टक्के भाजल्याने दुपारी ३.४२ वाजता तिचा मृत्यू झाला. डॉ.विशाल ओझा यांनी दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे चौकशी करीत आहेत.
 
घातपात केल्याचा संशय : मृतवैशालीचा विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात होता. तिला माहेरी जाऊ दिले जात नव्हते. माहेरच्यांकडून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे ती चार वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली होती. त्या वेळी सासरच्या लोकांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी पतीने समझाेता करून तिला परत आणले होते. मात्र, तरीही त्रास देणे सुरूच होते. बुधवारी रात्री तिने भाऊ महेंद्र याला फोन करून पतीसह सासरचे लोक मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी वाजता तिच्या पतीने सासरच्या लोकांना फोन करून घटनेबद्दल माहिती दिली. तर सासरच्या लोकांनीच तिला दोरीने बांधून, तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून जाळून टाकल्याचा अारोप माहेरच्या लोकांनी केला आहे.
 
पतीवर हल्ल्याचा प्रयत्न : वैशालीवरखासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सासर माहेरच्या लोकांची गर्दी झाली होती. दुपारी तिचा मृत्यू झाल्यानंतर तणाव अधिकच वाढला होता. पोलिसांनी पती संतोष याला ताब्यात घेतल्यानंतर माहेरच्या लोकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर काही नातेवाइकांना मारहाण केली. परंतु पोलिसांनी परिस्थिती गांभीर्याने हाताळून संतप्त जमावाची समजूत काढली. तर वैशालीच्या माहेरच्या लोकांनी फोटो काढणाऱ्या वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांवर संताप व्यक्त केला.
 
पतीसह चौघांना घेतले ताब्यात : वैशालीचापती एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करतो. त्याचे वडील उपजिल्हाधिकारी होते. तिच्या माहेरच्या लोकांनी मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे रामानंदनगर पोलिसांनी पती संतोषसह त्याचे वडील, आई भाऊ या चौघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांनी त्यांचे जबाब घेतले. शुक्रवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.
 
वैशालीने दिला मृत्यूपूर्व जबाब : रुग्णालयात जखमी अवस्थेत वैशालीने पोलिस उपनिरीक्षक वाघमारे नायब तहसीलदारांना मृत्यूपूर्व जबाब दिले आहेत. तपासाचा भाग म्हणून हे जबाब गोपनीय ठेवले आहेत. शुक्रवारी पोलिस ठाण्यात माहेरच्या लोकांच्या आरोपांसह वैशालीने दिलेल्या जबाबाची दखल घेतली जाणार आहे.
 

 
 
बातम्या आणखी आहेत...