आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या तावडीतून पतीची केली सुटका, महिलेचे काैतुकास्पद धाडस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव/चाेपडा - चाेपडा तालुक्यातील मालापूर येथे पत्नीने बिबट्याच्या तावडीतून मोठ्या धैर्याने आपल्या पतीची सुटका केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता चाेपडा तालुक्यातील मालापूर येथील वनविभागात ही घटना घडली. हल्ल्यात साईसिंग बारकू पावरा (रा. मालापूर, वय ३५) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साक्षात मृत्यू समोर दिसत असताना पतीला वाचवण्यासाठी पत्नीने दाखवलेल्या या धाडसाबद्दल काैतुक केले जात अाहे.


चाेपडा तालुक्यातील मालापूर येथील साईसिंग बारकू पावरा (वय ३५) हे त्यांची पत्नी सुनीता साईसिंग पावरा (वय ३०), मुलगी सिमला (वय ११) हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता कंदमुळे जमा करण्यासाठी जंगलातनिघाले होते. काही अंतरावर गेल्यानंतर साईसिंग आणि त्यांची पत्नी, मुलीपेक्षा थोडे पुढे चालत होते. अचानक काही कळण्याच्या आत बिबट्याने साईसिंगवर हल्ला केल्याने ते धाडकन खाली कोसळले. डोळ्यादेखत पतीवर बिबट्याने हल्ला करीत असल्याचे पाहून सुनीता यांनी जीवाच्या अाकांताने आरोळ्या मारण्यास सुरुवात केली. त्या आवाजाने बिबट्या घाबरला अाणि त्याने जंगलाकडे पळ काढला. या हल्ल्यात साईसिंगच्या चेहऱ्यावर, डाव्या हातावर छातीवर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.


तत्काळ१५ हजारांची मदत
बिबट्याच्याहल्ल्यात जखमी झालेल्या सायसिंगला वनविभागामार्फत तत्काळ १५ हजारांची मदत दिली जाणार अाहे. उपचारानंतर उर्वरित रक्कम दिली जाणार असल्याची माहिती वैजापूर वनक्षेत्रपाल एम.बी.पाटील यांनी दिली आहे.


ताे बिबट्याच
हल्ला झालेल्या परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली. तेथे बिबट्याचे पगमार्क अाढळले. ताे वाघ नाही, बिबट्याच अाहे.जखमीच्या अंगावरील जखमा बिबट्याच्या अाहेत. पी.अार.पाटील,उपवनसंरक्षक, चाेपडा

बातम्या आणखी आहेत...