आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband Get Life Imprisonment In Wife Murder Case

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप, धुळे जिल्हा न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून पत्नीवर लाेखंडी सळईने हल्ला करून खून केल्याप्रकरणी तालुक्यातील उडाणे येथील पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती अार. अार. कदम यांनी ही शिक्षा दिली.

तालुक्यातील उडाणे येथील सुरेखा ही पती गाैतम भगवान शिंदे यांच्याबराेबर राहत हाेती. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच सुरेखाची अाई शांताबाई थाेरात यांचे घर हाेते. जून २०१२ राेेजी पहाटे चार वाजता सुरेखाचा भांडणाचा अावाज अाईला अाला. त्या वेळी तिने शरीर संबंधाला नकार दिल्याने पतीकडून शिवीगाळ मारहाण सुरू हाेती. त्यानंतर सुरेखा अाणि तिची अाई घराबाहेर प्रातर्विधीसाठी निघून गेल्या. तेथून परत अाल्यावर काही वेळाने सुरेखाचा अाेरडण्याचा अावाज अाल्याने शांताबाई अाणि नातू रमाकांत हे पाहण्यासाठी गेले. या वेळी गाैतम हा सुरेखाला हातातील सळईने मारहाण करीत हाेता. सुरेखाच्या डाेक्यावर सळई लागल्याने ती खाटेवर रक्ताच्या थाराेळ्यात पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. याबाबत गाैतम शिंदे विरुद्ध तालुका पाेलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या प्रकरणात गाैतमविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला न्यायालयाकडून भादंवि कलम ३०२ नुसार खूनप्रकरणी जन्मठेपेची पाच हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात अाली. दंड भरल्यास सहा महिने शिक्षा भाेगावी लागेल. सरकारीकडून श्यामकांत पाटील यांनी बाजू मांडली.

नऊ साक्षीदारांची साक्ष : याखटल्यात एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात अाल्या. त्यात वैद्यकीय अधिकारी डाॅ. अजित पाटील, मृताची अाई शांताबाई थाेरात, सुरेखाचा मुलगा रमाकांत शिंदे, पंच सुभाष बाबाजी कर्णे, अाधार हाके, तपास अंमलदार सहायक पाेलिस निरीक्षक डी. के. ढुमणे यांच्या साक्षी निकालासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शांताबाई, वैद्यकीय अधिकारी डाॅ. पाटील यांची साक्ष परिस्थितीजन्य भक्कम पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून अाराेपीला शिक्षा सुनावली.

दुसरीच सळई सादर
खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या लाेखंडी सळईने अाराेपी गाैतमने पत्नी सुरेखाला मारहाण केली हाेती. ती सळई न्यायालयात दाेषाराेपासाेबत सादर करता दुसरीच सळई सादर करण्यात अाली हाेती. मूळ सळई गायब झाल्याचे सांगण्यात अाले. तरीही साक्ष महत्त्वाचे मानून न्यायालयाने शिक्षा दिली.