आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा रात्री केला खून; अंत्यसंस्कार सुरू असताना पतीचीही आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुलबाळ होत नसल्याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा टीव्हीच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना अासोद्यात गुरुवारी रात्री ११ वाजता घडली. त्यानंतर फरार झालेल्या पतीनेही शुक्रवारी अासोदा-भादली दरम्यान स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. दरम्यान, शुक्रवारी एकीकडे फुटबॉल फिवरमुळे उत्साह होता तर दुसरीकडे हत्या-आत्महत्यांनी दिवस काळवंडला. 

अासोदा येथील धनजीनगरातील पार्टिशनच्या घरात योगेश गौतम बिऱ्हाडे (वय ३०) हे पत्नी सीमा (वय २५) सोबत राहत होते. सीमाला मूल होत नसल्याने योगेश तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. गुरुवारी दुपारी मजुरीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला होता. पती योगेश पत्नीला सारखी मारझोड करीत असल्याने सीमा ग्रामपंचायतमध्ये व्यथा मांडण्यासाठी गेली होती. तेथेही दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर रात्री ११.४० वाजता तिचा मृतदेह कॉटवर आढळून आला होता. तिच्या गळ्यावर टीव्हीच्या वायरने आवळल्याच्या खुणा होत्या. रात्री १२ वाजता तिचा मृतदेह सिव्हिलमध्ये शवविच्छेदनासाठी आणला होता. शुक्रवारी सकाळी वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी तिचे वडील विजय जगन मोरे (रा.शिरसोली) यांच्यासह नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आले होते. याप्रकरणी अंकुश साळवे यांच्या फिर्यादीवरून योगेश बिऱ्हाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...