आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून पतीनेच उठविली सर्पदंशाची आवई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळे तालुक्यातील आर्वी येथे सुरेखा शेणगे या विवाहितेचा खून करण्यात आला. त्यानंतर रविवारी सकाळी सुरेखाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची आवई तिचा पतीकडूनच उठविण्यात आली; परंतु सुरेखाची मुलगी प्रीतीने कोणालाही जुमानता पोलिसांना खरी माहिती देण्यासोबत रक्ताने माखलेले अंथरुण कपडे पोलिसांना दाखविले. त्यामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला. तोपर्यंत मृत सुरेखाचे माहेरचे नातलग आर्वीमध्ये दाखल झाले होते. या घटनेनंतर आर्वीत तणावात्मक स्थिती निर्माण झाली होती. सर्पदंशाचे सांगितलेले बिंग फुटताच सुरेखाने स्वत:च खाटेवर डोके आपटून घेतल्याचे कारण सदाशिव शेणगे याने पुढे केले होते.

मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी येथे शेणगे कुटुंबीयांचे शेत आहे. निगराणीसाठी हे कुटुंब शेतात राहते. या कुटुंबात सदाशिव किसन शेणगे, त्याची पत्नी सुरेखा, मुलगी प्रीती सदाशिवची आई आहे. रात्री सदाशिव (४५) सुरेखा (४०) यांच्यात वाद झाला. या वादातून सदाशिवने सुरेखाला काठीने मारहाण केली. यानंतर तिची खाट घराबाहेर आणून टाकली. तर मुलगी प्रीती हिला काठीने मारहाण केल्यानंतर गळा अावळून ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय कोठेही वाच्यता करण्याचा दम भरला. वाद सुरू होण्यापूर्वी सदाशिवने मुलीला घराबाहेर झोपलेल्या अापल्या आईकडे पाठविले. पती-पत्नीमधील वाद काही वेळाने मिटेल असे सांगून तिच्या आजीने तिला शांत केले; परंतु काही वेळानंतर सदाशिव बाहेर आला. यानंतर त्याने मुलीलाही धमकावले. यानंतर सकाळी सुरेखाचा सर्पदंशाने मृत्यू झाला, अशी आवई सदाशिवने उठविली. त्यामुळे गावकरी त्याच्या घराकडे धावले; परंतु सुरेखाचा मृतदेह पाहता तिच्या डोक्यावर तसेच शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून आले. त्यामुळे अनेकांना याबाबत शंका आली. त्यामुळे सुरेखा हिने स्वत: खाटेवर डोके आपटून घेतल्यामुळे ती मृत झाली, असा खुलासा सदाशिवने केला. शिवाय भेदरलेली प्रीतीही याबाबत काही बोलण्यास तयार नव्हती. तिच्या डोक्यावर जखम गळा आवळल्यामुळे सूज होती. सुरेखाच्या मृत्यूबद्दल असाच निरोप तिच्या माहेरीही देण्यात आला. माहिती मिळताच श्रीरामपूर तालुक्यातील कामपूर येथून सुरेखाचे नातलग खासगी वाहनांनी दाखल झाले. एकंदरीत परिस्थिती पाहता त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी प्रीतीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर धुळे तालुका पोलिसांना कळविण्यात आले. काही वेळातच पोलिसही दाखल झाले. पोलिसांनी विचारणा केल्यावर प्रीतीने सर्व वृत्तांत सांगितला. तसेच सुरेखाच्या रक्ताने माखलेले कपडे अंथरूणही दाखविले. या वेळी खाटेवर लागलेले रक्ताचे डागही पोलिसांना मिळून आले. घटनेनंतर सायंकाळी सदाशिव शेणगे याच्या विरुद्ध सुरेखाचा खून प्रीतीवर प्राणघातक हल्ला केल्याबद्दल धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले होते. उपनिरीक्षक मिलिंद बनसोडे तपास करीत आहेत.
पुढे वाचा...
> चार भावांचे कुटुंब, मोठा भाऊ डाॅक्टर
> वडिलांच्या मृत्यूनंतर करण्यात आला खून
> खुनाला वादाची होती पार्श्वभूमी...
बातम्या आणखी आहेत...