आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband , Son Lilke Dislike Paying Attention : Sharmila Thakare

पती, मुलांच्या आवडी-निवडीवर लक्ष असते : शर्मिला ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘पती व मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवायला खूप आवडते. त्यांच्या आवडी-निवडींवर माझे लक्ष असते. राजसाहेबांची जीवनशैली खूपच धकाधकीची असली तरी त्यांच्यासोबत रोज सकाळी पायी फिरायला जाते..!’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिनी शर्मिला यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना आपल्या व्यस्त जीवनशैलीचे पैलू उलगडले. राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त रविवारी त्याही जळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

मी एक सामान्य गृहिणी!
आपल्या जीवनशैलीबद्दल शर्मिला म्हणाल्या की, मी सामान्य गृहिणींप्रमाणेच आहे. मुलांकडे आणि स्वयंपाकघरावर लक्ष देण्यावर माझा भर असतो. रोज घरी पाहुण्यांचा राबता असतो. त्यामध्ये राजसाहेबांचे दौरे, बैठकी व राजकीय चर्चा नेहमीच सुरू असतात. अर्थात, त्यांची जीवनशैली खूपच धकाधकीची असल्याने मी मात्र घराकडे पूर्ण लक्ष देते. घरात सासू, मुले यांच्या दिनचर्येकडे लक्ष द्यावे लागते. दुपारी 3 वाजेपर्यंत किचन सांभाळते. मुलांशी गप्पा मारणे व जेवणात कोणाला कोणता पदार्थ आवडतो, याकडे लक्ष असते. अर्थात, मलाही ते आवडते. माझ्या घरात सहा कुत्री आहेत. त्यांची वेगळी देखरेख असते. ती आमच्या कुटुंबातीलच एक घटक बनले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

पद्मालय दर्शन, शॉपिंगही
शर्मिला यांना व्यस्त दौºयातही जळगाव परिसर न्याहाळण्याचा मोह आवरला नाही. मुले उर्वशी व अमित आणि नातेवाइकांसह त्यांनी पद्मालय येथे गणेशाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर ‘बिग बझार’मध्ये जाऊन शॉपिंगही केले.