आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूलबाळ होत नाही म्हणून पत्नीला जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लग्नानंतरचार वर्षे झाले तरी मूलबाळ होत नव्हते, याचा राग येऊन पत्नीला जाळण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री वाजता रामेश्वर कॉलनीत घडला. यात ती महिला ७२ टक्के भाजली. अनिता कल्लुसिंग राजपूत (वय २३) असे तिचे नाव आहे. पती कल्लुसिंग याला पोलिसांनी अटक केली आहे.

अनिता ही मूळची जळगावातीलच आहे. चार वर्षांपूर्वी तिचा उत्तर प्रदेश येथील कल्लुसिंग शंकरसिंग राजपूत याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर हे जोडपे रामेश्वर कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होते. कल्लुसिंग हा चटईच्या कंपनीत कामावर जात होता. चार वर्षांत अनिताला मूलबाळ झाले नाही. या कारणामुळे दोघांमध्ये वेळोवेळी भांडणे होत होते. बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. रागाच्या भरात कल्लुसिंगने घरातील स्टोव्हमधील रॉकेल काढून अनिताच्या अंगावर टाकून पेटवून दिले. तिच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

आईला पाहताच अश्रू
रात्री१० वाजेच्या सुमारास अनितावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. पती कल्लुसिंगही तिथे हजर होता. तिचे आई-वडील देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. १०.३० वाजेच्या सुमारास आई-वडील रुग्णालयात दाखल झाले. त्यांना पाहताच अनिताच्या अश्रूंचा बांध फुटला. दीड तास मरण यातना सहन केल्यानंतरही तिने कल्लुसिंगचे नाव पोलिसांना सांगितले नव्हते. तिच्या आईने अनिताच्या डोक्यावर मायेचा हात फिरवताच तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी कल्लुसिंगला ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक सचिन बागुल तपास करीत आहेत.