आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या चाैकटीतून बाहेर पडले त्यामुळेच झाले यशस्वी! - रेखा चौधरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिलांच्या मनात काम करण्यापूर्वीच खूप प्रश्नचिन्ह असतात, ते बाजूला सारून स्वत:च स्वत:मध्ये अात्मविश्वास निर्माण करावा. अापणच स्वत:पासून प्रोत्साहित व्हावे अाणि स्वत:च्या शिलेदार व्हावे. मी घराच्या चाैकटीतून बाहेर पडल्यानंतरच यशस्वी झाले असे वेलनेसच्या भारतीय ब्रॅण्ड अॅम्बेसेडर मूळच्या खान्देशच्या असलेल्या रेखा चाैधरी यांनी सांगितले.

सॅटर्डे क्लबतर्फे रविवारी शहरात उद्याेजिका महिलांच्या परिषदेत यशोगाथा सादर करताना रेखा चौधरी यांनी महिलशी संवाद साधला. त्या मूळच्या खान्देशातील असून गल्लीपासून अापल्या व्यवसायाची सुरुवात करीत त्यांनी १२ वर्षांत मुंबईसारख्या शहरात स्वत:चे वेलनेस स्पा सेंटर सुरू केले आहे. यासोबत त्या झेप फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही प्रशिक्षित करीत आहेत.

जिद्द, आत्मविश्वासाच्या बळावर कमी भांडवलात काेट्यवधींचा व्यवसाय
>लग्न झाल्यानंतर शिरपुरात राहायला गेले. त्या वेळी कॉलनी हा माझ्यासाठी अपरिचित शब्द होता. सासुबाईंनी गरबा खेळण्याची मला परवानगी दिली, तेव्हा मी खरी चाैकटीतून बाहेर पडली.
>मी सुरूवातीला लहानसे ब्युटी पार्लर सुरू केले. पुढे मुलांच्या शिक्षणामुळे मुंबईला स्थायिक झालाे.
>२००४ साली मी एका परिषदेत हिंमत करीत ताेडक्या माेडक्या इंग्रजी भाषेत एका फ्रेंच महिलेशी संवाद साधत मला डिस्ट्रिब्यूटरशीप हवी असल्याचे तिला सांगितले. तेव्हा तिला माझ्यातील हिंमत अाणि अात्मविश्वास अावडला. यातून पुढे जिद्द, आत्मविश्वासाच्या बळावर कमी भांडवलात काेट्यवधींचा व्यवसाय करीत आहे. यातून १०० जणांना राेजगार उपलब्ध करून दिला अाहे.
>झेप फाउंडेशनअंतर्गत अमळनेर नंदुरबार येथील महिला-मुलींना साैरऊर्जेचा उपयाेग करीत कशाप्रकारे व्यवसाय करता येईल, याबाबत प्रशिक्षण नुकतेच देण्यात अाले. महाराष्ट्रात प्रथमच ही संकल्पना राबवण्यात अाली. यात साैरऊर्जा कशी निर्माण हाेते, त्याचा उपयाेग सांगत त्याचे बिझनेस माॅडेल त्यांना देण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...