आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • I Rarita 2 Online Project Of Marriage Registration

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाहनोंदणीची प्रक्रियाही आता होणार ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद करण्यासाठी क्रांतिकारी ठरलेली ‘आय सरिता’ या प्रणालीची सुधारित आवृत्ती अधिक गतिमान होणार आहे. नवीन प्रणाली ‘आय सरिता 2’ या नावाने कार्यान्वित होणार असून, त्यात विवाहांच्या ऑनलाइन नोंदणीचाही पर्याय राहणार आहे. गतिमान आणि लोकाभिमुख ही प्रमुख वैशिष्ट्ये या प्रणालीमध्ये असतील.

‘आय सरिता’ प्रणालीचा राज्यभर वापर सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाऊन ही मोठी समस्या निर्माण झाली होती. प्रणालीतील तांत्रिक दोषासह किचकट बाबी वगळून प्रणाली अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने एक समिती स्थापन करून प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ‘आय सरिता’ अधिक वेगवान आणि सोपे ऑप्शन ठेवण्यासाठी तांत्रिक काम सुरू आहे. त्याला आणखी दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागणार आहे. नव्या प्रणालीला आधारही जोडण्यात येणार असल्याने संपूर्ण व्यवहारांचीही माहिती सहज मिळू शकेल.

सर्व्हर डाऊनची समस्या होणार दूर
सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे निर्माण होणारी अडचण आता दूर होणार आहे. ‘आय सरिता’साठी आणखी 20 सर्व्हर लावण्यात आल्याने येत्या आठवड्यात यंत्रणा संथ चालल्याची समस्या कमी होईल. व्यवहारांची ऑनलाइन नोंदणी वेळेत होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

वेळ, दिवस करता येतील निश्चित
मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आधी ऑनलाइन विवरण भरून व्यवहार नोंदणीची वेळ आणि दिवस निश्चित केला जातो. नवीन प्रणालीप्रमाणे विवाहेच्छुक तरुण-तरुणी ऑनलाइन नोंदणी करून वेळ आणि दिवस निश्चित करू शकतील.

गेल्या वेळच्या अडचणींचा शोध
ग्राहकांना नोंदणी करताना येणार्‍या अडचणी, त्यांच्या अपेक्षा, तांत्रिकदृष्ट्या लागणारा वेळ या गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांत अनुभव आलेल्या विविध ग्राहकांची मतेदेखील त्यासाठी जाणून घेण्यात आली आहेत. नोंदणी कार्यालयांमध्ये सोयीस्कर वाटतील, असे छोटे बदलही त्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न
जनतेला येणार्‍या अडचणी आणि तांत्रिक दुरुस्त्यांसाठी ‘आय सरिता 2’ या प्रणालीचे काम सुरू आहे. अडचणींचा अभ्यास करून प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन सर्व्हरमुळे गती वाढेल; परंतु नवीन आवृत्ती अधिक लोकाभिमुख आणि उपयोगी असणार आहे. सुनील पाटील, दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक विभाग