आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री मीही हाेताे; पण नेहमी जमिनीवर चालायचाे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शेतकऱ्यांची बँक असल्याने संतापाच्या भरात अापल्याच बँकेत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर दराेड्याचे गुन्हे दाखल केले, हे चुकीचे अाहे. शेतकऱ्यांसाठी एकही बँकेचा संचालक पुढे अाला नाही? हे दुर्दैव अाहे. त्यांचा निषेध केला पाहिजे, तर या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या अामदार गुलाबराव पाटील यांचे काैतुक अाणि अभिनंदन केले पाहिजे. दरम्यान, मीदेखील जिल्ह्याचा पालकमंत्री हाेतो; परंतु जमिनीवर चालायचाे. कधीही गर्व केला नाही, की विराेधात बाेलणाऱ्यांचा अावाज दाबला नसल्याचा टाेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील यांनी पालकमंत्री खडसे यांचे नाव घेता जिल्हा बैठकीत लगावला.

शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वगळून मदत जाहीर केली अाहे. त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यात अांदाेलन करणार अाहे. त्याच्या नियाेजनासाठी शुक्रवारी जिल्हा बैठक अायाेजित केली हाेती. या वेळी त्यांनी जिल्हा बँक, पालकमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून हाेत असलेल्या शक्तिप्रदर्शनावरून फटकेबाजी केली. पालकमंत्री खडसे यांनी मेळाव्यात वापरलेली भाषा ही गर्वाची हाेती. कृषिमंत्री असूनही शेतकऱ्यांची सीअायडी चाैकशी करणार अाहेत, हे दुर्दैव अाहे, असे ते म्हणाले.

हाेर्डिंग काढणार का?...
मनपानेशहरातील बेकायदेशीर हाेर्डिंग काढण्याचे म्हटले अाहे. परंतु, जलसंपदामंत्र्यांच्या शिबिराचे हाेर्डिंग अजूनही अाहेत. त्यात गडकरींच्या सभेचे शेकडाे हाेर्डिंग लागले अाहेत, हे मनपा काढणार का?असा प्रश्न डाॅ.पाटीलांनी उपस्थित केला.

कापूस उत्पादकांसाठी रस्त्यावर...
कापूसउत्पादक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याने त्याविराेधात राष्ट्रवादी प्रत्येक तालुक्यावर अांदाेलन करणार आहे, या संदर्भात माजी अामदार साहेबराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.

देवकरांना शुभेच्छा...
लाेकसभानिवडणूक लढण्याची माझी हाैस संपली. त्यामुळे अागामी काळात गुलाबराव देवकरांना लाेकसभेसाठी शुभेच्छा, असे डॉ.पाटील यांनी सांगितले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी अामदार दिलीप वाघ, दिलीप साेनवणे, परेश काेल्हे, याेगेश देसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

नेत्यांवरील वक्तव्यावर अाक्षेप...
अांदाेलनाबाबतडाॅ.पाटील मार्गदर्शन करत असताना जळगाव तालुक्यातील कार्यकर्ते नवल पाटील यांनी हरकत घेतली. अांदाेलन करताना तालुक्यात कार्यकर्ते एकाकी पडले आहेत. निवेदन देण्यासाठी काेणीही नेता येत नाही. जळगावला नेताच नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी त्यांना थांबवत गुलाबराव देवकर हे जळगाव ग्रामीणचे नेते असताना असे वक्तव्य केलेच कसे? म्हणून अाक्षेप घेतला. सावदा येथील नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनीही जिल्हा बँकप्रकरणी अाक्षेप घेतला.

मंत्र्यांमध्येच गटबाजीची जुगलबंदी...
पालकमंत्रीएकनाथ खडसे अाणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात गटबाजी, शक्तिप्रदर्शनाची जुगलबंदी सुरू अाहे. महाजनांनी २० हजार लाेक जमवले, तर खडसे ५० हजार लाेक जमवून शक्तिप्रदर्शन करत अाहेत. यात प्रत्येक गावातून कार्यकर्ते अाणण्यासाठी गाडी, डिझेलची व्यवस्था केली अाहे. शक्तिप्रदर्शनाएेवजी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तर जनतेला असे वेठीस धरणे चुकीचे अाहे. मर्जीतील मंत्र्यांना अाणण्यासाठी दाेन्ही मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा अाराेप कार्याध्यक्ष विलास पाटील यांनी केला.
छायाचित्र: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बाेलताना जिल्हाध्यक्ष अामदार डॉ. सतीश पाटील आणि उपस्थित पदाधिकारी.