आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव आजीने करून दिल्याने झालो आयएएस; अाशिष पाटील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माझ्या अाई-वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव आजीने करून दिल्यानेच आज मी यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस झालो, अशी माहिती वयाच्या २५व्या वर्षीच यूपीएससी परीक्षेत ३३० रँक मिळवून उत्तीर्ण झालेले अाशिष पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. 

आशिष पाटील यांनी साेमवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात भेट दिली. या वेळी त्यांच्यासाेबत अाई कुसुम पाटील आणि गाेपाल दर्जी उपस्थित हाेते. यूपीएससी परीक्षेचा सतत चार वर्षे कसा अभ्यास केला आणि परीक्षेत मिळवलेल्या यशाचे गमक पाटील यांनी या वेळी उलगडून सांगितले. तसेच नियमित अभ्यास, जिद्द आणि अात्मविश्वासाच्या जाेरावरच आपण यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी 
अायएएसमुळेमला अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी अाहे. माझे सर्व नातेवाईक शेतकरी अाहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या माहिती अाहेत. त्या साेडवण्यावर माझा भर असेल. मला शिक्षण क्षेत्रासह स्त्री-पुरुष समानता या विषयावर अायएएस पदामुळे काम करण्याची संधी अाहे. अाता अायुष्य खूप बदलले अाहे. पूर्वी एस.टी. बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड असायची. अाता गाडीत फिरताेय हा वेगळाच अनुभव अाहे. अाई-वडिलांची मी सगळी जबाबदारी घेऊ शकताे, याचा अानंद असल्याची भावनादेखील अाशिष पाटील यांनी व्यक्त केली. 

डाेळसपणे विचार करावा 
स्पर्धापरीक्षेची तयारी लाखाे उमेदवार करतात. त्यातील चाचळीतून केवळ १८० उमेदवार अंतिम मुलाखतीतून उत्तीर्ण हाेतात. अशा वेळी अपयश अाल्याने खचून जाता पुन्हा प्रयत्न करायला हवे. पण दाेन-तीन वेळा प्रामाणिक प्रयत्न करूनही यश अाल्यास वास्तव स्वीकारून अापल्या क्षमतेनुसार दुसऱ्या परीक्षा देऊन त्यात यश संपादन करावे. अापल्या उमेदीचा काळ वाया घालवू नये. स्वत:ची किंवा कुटुंबीयांची फसवणूक करू नये, असे मत अाशिष यांनी व्यक्त केले. 

‘ट्रान्सजेंडर’चा अभ्यास 
दिवसभरखाेलीत अभ्यास करीत राहायचाे. माेबाइलवर वाचता वाचता झाेपून जायचाे. मी नियाेजनपूर्वक अभ्यास केला नाही. झाेप पूर्ण झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायचाे. या वर्षी मी परीक्षा पास हाेईलच याचा मला पूर्ण अात्मविश्वास हाेता. त्यामुळे अापण दिलेली उत्तरे ही इतरांपेक्षा कशी वेगळी लिहिता येईल, सांगता येईल, यावर माझा भर हाेता. तसेच ट्रान्सजेंडर विषयाचा अभ्यास केला. मुलाखतीच्या वेळेला माझ्या क्षेत्रातील अनेक प्रश्न मला विचारले गेले. मी मात्र अनेक प्रश्नांची उत्तरे ‘नाे’ सांगितली. मी खूप खरेपणाने ते बाेललाे हा माझ्यातील अात्मविश्वास पॅनलला अावडला हाेता. 

वर्षांपासून फक्त अभ्यासच 
इलेक्ट्राॅनिक्समध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर यूपीएससी करायचे ठरवले हाेते. मला जे काही करायचे ते अाई, वडिलांनी नेहमी करू दिले. लहानपणापासूनच अाई कुसुम अाणि शिक्षक असलेले अाजाेबांनी माझा खूप अभ्यास घेतला. यूपीएससी पेक्षा अधिक सातवीच्या स्काॅलरशिपमध्ये मी अभ्यास केला. वडिलांचे वेल्डिंग काम असल्यामुळे अाई अभ्यास घ्यायची. यूपीएससीचा अभ्यास सुरू असताना वर्षांपासून पुणे येथे खाेली करून मित्रासाेबत राहत हाेताे. अगदी दिवाळीतही तावसे (ता. चोपडा) गावी घरी नातेवाइकांच्या लग्नात गेलाे नाही. अभ्यास, जिद्द अात्मविश्वासाच्या जाेरावर यशस्वी झालो. 
बातम्या आणखी आहेत...