आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आइसलँडच्या पर्यटकांनी वाजवले ढोल अन् ताशे, महिला ढोल पथकात घेतले प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आइसलँडमधीलपर्यटक अनुभूती शाळेची पाहणी आणि अभ्यासासाठी शहरात आले आहेत. त्यांनादेखील गणेशोत्सवाचा मोह आवरता आला नाही. अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेतर्फे आयोजित महिला ढोल पथक प्रशिक्षणात गुरुवारी परदेशी पर्यटकांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. त्यांनी ढोल हातात कसा धरायचा, कमरेला कसा बांधायचा, त्याचा ठेका काय असतो हेदेखील जाणून घेतले. आइसलँडमधील हे विद्यार्थी भारताच्या दौ-यावर आले आहेत. शहरातील ‘अनुभू्ती २’ या शाळेची पाहणी, त्या शाळेचा अभ्यास ते करीत आहेत.

विविधविद्याशाखेचे विद्यार्थी
इदा,रोझा, क्लेमेन्स आणि मॅथियस हे चार विद्यार्थी जळगावात आले आहेत. इदा ही भाषेचा, रोझा विज्ञान शाखेचा, क्लेमेन्स संगीत आणि लाकडाच्या शिल्‍प कलेचा तर मॅथियस हा भाषा आणि वेगवेगळ्या कलांचा अभ्यास करीत आहेत. पहिल्यांदाच ते भारत दौ-यावर आले आहेत. त्यांना फक्त गणेश फेस्टिव्हलविषयी माहिती होती. ढोल, ताशांचे वाद्य त्यांनी प्रथमच पाहिले. त्यांनी हा खूप मोठा उत्सव आहे. यात खूप ऊर्जा लागतेय, आम्हाला खूप आवडले, शहरातील लोक खूप मदत करतात, ते प्रेमळ असल्याची भावना त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
पर्यटकांनी घेतली माहिती
गेल्याबारा दिवसांपासून ढोलचे प्रशिक्षण सुरू आहे. पर्यटकांनीही आपली संस्कृती काय असते, याची माहिती घेत ढोल वाजवण्याचा आनंद लुटला. त्यांनी उत्साहात सहभाग नोदंवला. विनोद ढगे, आयोजक.