आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावच्या तरुणाचा इचलकरंजीत खून; शालकाच्या लग्नपत्रिका वाटण्यास गेला होता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तांबापुरा परिसरातील कंजरवाड्यामधील बबलू नवले हा त्याच्या शालकाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी इचलकरंजी येथे गेला हाेता. शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ७ ते ८ जणांनी गुप्ती धारदार शस्त्राने बबलूवर हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या बबलूचा शनिवारी सकाळी ९.३० वाजता कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
बबलू सुभाष नवले (वय ३३) याचा शालक विशाल विनायक नेतलेकर (रा. जळगाव) याचे ८ मे रोजी इचलकरंजी येथे लग्न आहे. त्या लग्नाच्या पत्रिका वाटपासाठी बबलू त्याची मेहुणी लक्ष्मी असे दोघं जण २ मे रोजी रेल्वेने जळगाव येथून इचलकरंजीला गेले होते. कोल्हापूर, सातारा, नीरा (ता. बारामती) येथे पत्रिका वाटप झाल्यानंतर बबलू त्याचा चुलत शालक रोहन सावंत हे दोन्ही जण शुक्रवारी दुचाकीने इचलकरंजी परिसरातील पत्रिका वाटपाचे काम करीत हाेते. रात्री ९.३० वाजता दकनूर चौकात रोहन कुणाल सावंत यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये यापूर्वीही वाद होते. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बबलूवर काही जणांनी गुप्ती धारदार शस्त्राने हल्ला केला. यात बबलू गंभीर जखमी झाल्याचे पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. बबलूला सुरुवातीला इचलकरंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यानंतर कोल्हापूरला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुणाल सावंत, त्याचा मामा अन्य पाच जण अशा सात जणांविरुद्ध इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. 
घटना घडल्यानंतर शुक्रवारी रात्री १.३० वाजता कंजरभाट समाजाचे नेते जयराज भाट यांनी जळगाव येथे नरेश बागडे यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर बागडे, राहुल नेतलेकर, विजय अभंगे सचिन बाटुंगे असे समाजबांधव शनिवारी इचलकरंजी येथे रवाना झाले. या घटनेमुळे विशाल नेतलेकर याचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. 
 
राेजगारासाठी जळगावात 
बबलू याचे मूळ गाव बारामती तालुक्यातील नीरा आहे. त्याचे आई वडील गावाकडेच असतात. रोजगारानिमित्त तो काही वर्षांपासून जळगावात स्थायिक झाला होता. पत्नी नूतन, मुलगा दर्शन (वय ८), मुलगी जान्हवी (वय १२) वैष्णवी (वय १०) यांच्यासह बबलू तांबापुरातील कंजरवाडा येथे राहत होता. 
बातम्या आणखी आहेत...