आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयडीबीआय बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांची मनमानी; वेळेआधीच बंद करण्यात अाले व्यवहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बँकेत सर्व प्रकारच्या व्यवहारांची वेळ ठरलेली असतानाही ग्राहकांना बँकेत व्यवहार करण्यासाठी येण्यास तब्बल अर्धा तासआधीच  प्रशासनातर्फे मज्जाव करण्यात आला. शहरातील स्टेशन रोडवरील आयडीबीआय बँकेत मंगळवारी हा प्रकार घडला. यामुळे रांगेत उभे असलेले वृद्ध, महिला, अन्य ग्राहकांना या गाेष्टीचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या वेळी ग्राहकांनी संताप व्यक्त करत बँकेच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या चार दिवसांपासून असाच प्रकार सुरू असल्याचे ग्राहकांनी सांगितले.
 
आयडीबीआय बँकेच्या स्टेशन रोड शाखेत मागील चार दिवसांपासून ग्राहकांची गर्दी वाढली अाहे. या कारणाने व्यवहारांची वेळ ४.३० वाजेची असतानाही ग्राहकांना बँकेत येण्यास वाजेपासूनच मज्जाव केला जात अाहे. मंगळवारी दुपारी वाजता काही नियमित भरणा करणाऱ्या अन्य बंॅक ग्राहकांना या गाेष्टीचा अनुभव आला. वाजेला बँकेत असलेल्या शहरातील दैनंदिन भरणा करणाऱ्या करंट खातेदार रावेर, यावल येथून पेन्शनसह विविध कामांसाठी आलेले ग्राहक ते रांगेत असतानाच बँकेचे व्यवहार बंद झाल्याचे कारण देऊन त्यांचे व्यवहार करण्यास नकार दिला. या वेळी काही ग्राहकांनी तक्रार केल्याने कर्मचारी ग्राहकांमध्ये वादाची घटनाही घडली.
 
सीडी-एममशीनचा अाग्रह
आयडीबीआय बँक कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना पैसे भरण्याकरिता ‘सीडी-एम’ मशीनचा आग्रह केला जातो. मात्र, या मशीनमध्ये अनेक तांत्रिक दोष असल्याने ग्राहकांकडून ही पद्धत वापर करण्याबाबत टाळले जाते. दरम्यान, आयडीबीआय बँकेचे कर्मचारी जेवणाच्या वेळेनंतर दुपारी टाइमपास करत असल्याने ग्राहकांची कामे आटोपण्यास उशिर हाे असताे. त्यामुळेच दुपारी वाजता ग्राहक आल्यास कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या तक्रारीही अनेक ग्राहकांनी केल्या आहेत.
 
कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
दोन दिवसांपासून व्यवहार वाढले असून, ग्राहकांची संख्या अधिक होती. परिणामी, अल्प कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत होता. ग्राहकांना ‘सीडी-एम’ मशीन वापरण्याची सुविधा आहे. मात्र, त्याचा ग्राहकांकडून उपयाेग केला जात नाही. यापुढे निश्चित केलेल्या वेळेनंतरच प्रवेश बंद केला जाईल. ग्राहकांनी सहकार्य करावे.
- राहुलनागवंशी, व्यवस्थापक, अायडीबीअाय बँक
 
बातम्या आणखी आहेत...