आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी दराेडेखाेर, मग वाळूमाफिया काेण? गुलाबरावांचा पाेलिसांना संतप्त सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांना जाब विचारताना आमदार गुलाबराव पाटील, संतप्त शेतकरी अन् शिवसैनिक.
जळगाव - हवामानावर आधारित पीक विम्याच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत अांदाेलन करत व्यवस्थापकांची खुर्ची फेकली हाेती. या प्रकारानंतर बुधवारी शेतकऱ्यांवर दंगलीचा, तर गुरुवारी थेट दराेड्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या प्रकारामुळे संतापलेले शेतकरी शिवसेना उपनेते अामदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी थेट जिल्हापेठ पाेलिस ठाण्यावर धडकले. गुन्हा दाखल असलेल्या शेतकऱ्यांनी स्वत:ला अटक करण्याची मागणी केली. या वेळी गुलाबराव जिल्हा पेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्यामध्ये जाेरदार खडाजंगी झाली. पाेलिस अधीक्षकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नमते घेत चाैकशीअंती दाेन्ही कलम मागे घेण्याचे अाश्वासन दिल्याने शेतकरी माघारी परतले. दरम्यान, अांदाेलनामुळे पाेलिस ठाण्याच्या अावारात प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता.

दाेन दिवसांपासून जिल्हा बँकेतील वादाचे जाेरदार पडसाद उमटू लागले अाहेत. मंगळवारी हवामानावर अाधारित पीक विम्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांच्या दालनात अांदाेलन केले हाेते. त्यानंतर काही तासांतच १५ ते २० शेतकऱ्यांविराेधात कलम ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी पुरवणी फिर्यादीत शेतकऱ्यांविरुद्ध थेट दराेड्याचा कलम ३९५ लावण्यात अाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली हाेती. त्यामुळे संबंधित अांदाेलक शेतकऱ्यांना अटकेसाठी पाेलिसांकडून तातडीने पाऊल उचलण्यात अाल्याचे वातावरण तालुक्यात पाहायला मिळत हाेते. पाेलिसांच्या गाड्यादेखील अांदाेलकांच्या गावात फ‍िरू लागल्या हाेत्या. त्यामुळे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास अाव्हाणे फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता राेकाे करण्याचा निर्णय घेतला हाेता. परंतु, अामदार गुलाबराव पाटील यांनी थेट जिल्हापेठ पाेलिस ठाण्यावर शेतकऱ्यांचा माेर्चा काढल्याने वातावरण तापले. सुमारे २०० ते २५० शेतकरी उपस्थित हाेते.

एमडींवर गुन्हा दाखल करा
शेतकऱ्यांच्याविम्याची रक्कम वर्ग हाेऊनही त्याची माहिती देणाऱ्या जिल्हा बँकेच्या एमडींमुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला अाहे. या संपूर्ण परिस्थितीला एमडी जबाबदार असल्याने अाधी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी पाेलिस निरीक्षक श्याम तरवाडकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या कपात केलेल्या पैशांतून पगार घेणारा एमडी शेतकऱ्यांच्या विराेधात गुन्हा दाखल करत असल्याने निषेध व्यक्त करण्यात अाला. अांदाेलनानंतर दुसऱ्याच दिवशी विम्याचे काेटी कसे काय अालेत? असा सवालही शेतकऱ्यांनी केला.

पाेलिस अधीक्षकांचे अाश्वासन
शेतकऱ्यांचावाढता संताप लक्षात घेता निरीक्षक तरवाडकर यांनी पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांच्याशी संपर्क साधला. अामदार गुलाबराव पाटलांनी सुपेकरांशी चर्चा केली. शेतकऱ्यांवर दाखल कलम ३५३ ३९५ रद्द करण्याची मागणी केली. सुपेकरांनीदेखील चाैकशीत पुरावे अाढळल्यास कलम रद्द करण्यात येतील, असे अाश्वासन दिले. या वेळी रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी मध्यस्थी करत अांदाेलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. िफर्याद काेणीही देऊ शकताे. चाैकशीत सबळ पुरावे जमा झाले नाहीत, तर कलम डिस्चार्ज केले जातात. या प्रकरणी शेतकऱ्यांना अटक हाेणार नाही. लवकरच चाैकशी करून वस्तुस्थिती शाेधू, असेही निरीक्षक तरवाडकर यांनी स्पष्ट केले.

दराेड्याचे कलम लावणे निंदनीय :
शेतकरीअांदाेलनानंतर घडलेल्या प्रकारातून राजकारण राजकीय पक्ष बाजूला ठेवले, तर अामदार गुलाबराव पाटलांना त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करणे गरजेचे अाहे; परंतु बंॅक, िवमा निधीचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांच्या गैरसमजुतीतून हा प्रकार घडला अाहे. बँकेतील गाेंधळानंतर कलम ३५३ लावण्याचा विषय समजू शकताे; परंतु कलम ३९५ लावून दराेड्याचा गुन्हा दाखल व्हायला नकाे हाेता. ते निंदनीय असल्याचे मत अामदार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशाेर पाटील यांनी स्पष्ट केले. दराेड्याचे कलम मागे घेण्यासाठी मी स्वत:ही प्रयत्न करेन. असेही ते म्हणाले.

अांदाेलकशेतकरी नाहीत
विम्याच्यारकमेसाठी जिल्हा बँकेत अांदाेलन करणारे बरेच जण शेतकरी नाहीत. त्यांचा बँकेशी काहीही संबंध नसल्याचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी सांगितले. विम्याशी निगडित कागदपत्रांची फाइल बँकेतून हरवली अाहे. त्यातील कागदपत्रांची अाता माहिती घेतली जात अाहे; परंतु या सर्व परिस्थितीचा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेवर काहीही परिणाम हाेऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

कलम लावणे पाेलिसांचे काम
बँकेतघडलेल्या प्रकारानंतर तक्रार देणे, हे कर्मचाऱ्यांचे काम अाहे. मात्र, काेणते कलम लावायचे याचा निर्णय पाेलिस अधिकारी घेतात. त्यामुळे याप्रकरणी काेणते कलम लावले याच्याशी फ‍िर्यादीचा काहीही संबंध नसल्याचे मत अध्यक्षा राेहिणी खडसे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी झगडणे गैर अाहे का?
पाेलिसांत तक्रार अाल्यावर चाैकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाताे. परंतु, जिल्हापेठ ठाण्याने तक्रार येताच गुन्हा दाखल करण्याची तत्परता कशी काय दाखवली? चाैकशी करता थेट ३५३ ३९५ चे कलम लावण्यात अाले. चाेरांना पकडू शकत नाही अाणि शेतकऱ्यांवर रुबाब दाखवला जात असल्याने पाेलिसांच्या भूमिकेचा निषेध करण्यात अाला. तसेच शेतकऱ्यांना तुम्ही दराेडेखाेर ठरवले मग वाळुमाफिया काेण अाहेत? शेतकऱ्यांनी हक्कासाठी झगडणे गैर अाहे का? असा सवाल गुलाबरांवानी केला. तसेच पाेलिस दबावाखाली काम करत असल्याचा ठपका ठेवला.
काेण अनाथांचा नाथ मागे बसला हे माहिती अाहे
पत्रकारांशीबाेलताना अामदार गुलाबराव पुन्हा एकदा बरसले. शेतकऱ्यांच्या बापाची ही बँक अाहे. यात काेणती कॅश लुटली तर दराेड्याचा गुन्हा दाखल केला? एमडी जाे पगार घेताे ताे शेतकऱ्यांच्या पैशांवर घेताे. पाेलिस काय अटक करतील, अाम्हीच अटकेसाठी येताे, म्हणून हा माेर्चा काढला. जर अटक करायची नसेल, तर कलम रद्द करा. जेल ही मर्दाकरता असते. शेतकरी चांगल्या बैलालाही दणका देताे, तर हे अधिकारी काय लागले, असा इशारा दिला. यात दबाव काेणाचा? हे सर्व जिल्ह्याला माहिती अाहे. रेतीवाल्यांच्या मागे काेण? पाॅली हाऊसचे अनुदान काेण खाताेय? अाता केबल वाॅर अाले अाहे, लाेकांना सगळे काही माहिती अाहे, की काेण अनाथांचा नाथ मागे बसला अाहे ते. शेतकऱ्यांना काेणी धक्का लावून अन्याय केला, तर रस्त्यावर उतरू. शेतकरी भडकला अाहे. काेणी त्याच्या नादी लागू नये. जर पाेशिंद्याच्या मागे काेणी लागत असेल अथवा अाडवा येत असेल, तर अाडवा करण्याची ताकद शेतकऱ्यात असल्याची प्रतिक्रिया अामदार पाटील यांनी दिली.