आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Points Criteria Reduction Then Many Engineering Opportunities

गुणांचा निकष घटवल्यास अनेकांना अभियांत्रिकीची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशाचा टक्का घसरतो आहे. यंदाही सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहणार आहेत, तर दुसरीकडे इलिबिजिलिटी ग्रुप विषयांचे गुण कमी पडत असल्याने राज्यभरात सुमारे २० हजार वदि्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रवेशापासून वंचित आहेत. शासनाने या गुणांचा निकष घटवल्यास हे विद्यार्थी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी पात्र ठरू शकतात. तसेच डबघाईस आलेल्या अभियांत्रिकी महावदि्यालयांनाही पुनरुज्जीवन मिळणार आहे.

जेईई आणि सीईटी परीक्षा देऊनही कमी गुण मिळाल्यामुळे हजारो वदि्यार्थांना अभियांत्रिकीला प्रवेश घेता येत नाहीये. त्यासाठी गणित, भौतिकशास्त्र हे दोन आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि व्होकेशनल या तीन पैकी कोणताही एक असे एकूण तीन विषयांच्या गुणांची बेरीज करून सामान्य वदि्यार्थ्यांना १४९ विशिष्ट संवर्गातील वदि्यार्थ्यांना १३४ गुण असल्यास त्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेता येत आहे. २०१३-१४ मध्ये सामान्य वदि्यार्थ्यांना १३५ विशिष्ट संवर्गातील वदि्यार्थ्यांना १२० गुणांची अट होती. त्यामुळे हजारो मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण घेता आले. दोन वर्षांपासून गुणांची अट वाढवल्यामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने यंदाही १३५ १२० गुणांची अट केल्यास प्रवेश वाढण्याची अपेक्षा आहे.

‘मेस्टा’नेकेले प्रयत्न : २०१३-१४मध्येशासनाने सुरुवातीला जास्त गुणांची अट ठेवली होती. त्या वेळी ‘मेस्टा’ने (महाराष्ट्र राज्य इंजिनिअरिंग कॉलेज टिचर्स असोसिएशन) न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होण्याच्या आधीच शासनाने गुणांची अट कमी करत १३५ १२० केली होती. त्यानंतर २०१४-१५ सध्या २०१५-१६ लादेखील निकष वाढवले. त्यामुळे अनेकजण अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ शकत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शासनाने अट कमी करावी
राज्यशासनाने सध्याची परिस्थिती पाहता सन २०१३-१४ प्रमाणे १३५ १२० गुणांची अट लागू केली पाहिजे. त्यामुळे अभियांत्रिकी महावदि्यालयांसह वदि्यार्थ्यांचाही फायदा होईल. यासंदर्भात न्यायालयीन लढा पुकारला पाहिजे. प्रा.एन.सी.घुगे,सदस्य, मेस्टा