जळगाव - सुभाष चाैकातील हाॅकर्सला शनिवारी संध्याकाळी वाजेपर्यत लाॅट पाडून लकी ड्राॅ पध्दतीने बी.जे.मार्केट परिसरात जागा देण्यात अाली. दुपारी वाजता अायुक्तांनी हाॅकर्सशी ‘दगड मारून, शिव्या देऊन जर समस्या सुटणार असेल तर मी तुमच्या समाेर उभा आहे’, असा भावनिक संवाद साधून हॉकर्सच्या सर्व समस्या साेडविण्याचे अाश्वासन दिले. एकीकडे मनपा अायुक्त हाॅकर्सला भावनिक साद घालत असताना काही हाॅकर्सनी संध्याकाळी वाजता सुभाष चाैकात शनिवारच्या अाठवडी बाजाराचा फायदा घेण्यासाठी पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटली. त्यामुळे सुभाष चाैकात नेहमी प्रमाणे प्रचंड गर्दी हाेऊन वाहतूक ठप्प झाली हाेती.
सुभाष चौकातील हॉकर्सला शनिवारी लॉट पाडून लकी ड्रॉ पद्धतीने बीजे मार्केट परिसरात जागा दिल्या जाणार हाेत्या. त्यामुळे सकाळी १० वाजेपासूनच हॉकर्स महापालिकेच्या पार्किंगमध्ये जमले होते. दुपारी वाजता आयुक्त संजय कापडणीस, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, उपायुक्त प्रवीण जगताप, नगरसेवक अनंत जोशी, अमर जैन, राजकुमार आडवाणी यांच्या उपस्थितीत अायुक्तांनी हॉकर्सशी संवाद साधला. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात टप्प्या-टप्प्याने १४-१४ हॉकर्सला बोलावून त्यांच्याच हाताने चिठ्ठी निवडून त्यांना ओट्यांचे क्रमांक देण्यात आले. असे असतानाही संध्याकाळी वाजता काही हाॅकर्सनी शनिवारचा बाजाराचा फायदा घेण्यासाठी दुकाने थाटली हाेती. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली हाेती.
आता तुम्हाला कोणीच उठवणार नाही : नवीन जागेवर तुम्ही बसणार असल्यामुळे तेथील रहिवासी, व्यापारी यांच्याकडून तुम्हाला तात्पुरता विरोध होऊ शकतो. अशा वेळी गोंधळ घालू नका, पालिका तुमच्या सोबत आहे. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगून जागेवरच समस्या सोडवून घ्या. आता तुम्हाला नवीन जागेवर कुणीच दम देणार नाही किंवा त्या ठिकाणावरून उठवणार नाही, असे अाश्वासनही अायुक्तांनी हाॅकर्सला दिले. गोंधळ घालणारे लोक हे बाहेरचे आहेत, सुभाष चौकातील खरे हॉकर्स शांतताप्रिय आहेत. त्यामुळे बाहेरच्यांना सोबत ठेऊ नका, असा सल्लाही दिला.
आयुक्तांचा हॉकर्ससोबत भावनिक संवाद
प्रत्येकहॉकर्सची सोय करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्यात येणार आहे. ज्या हॉकर्सने डेली पावतीचे पैसे नियमितपणे भरले आहेत. त्यांच्यापासून ते शेवटच्या घटकापर्यंत सर्वांनाच जागा देण्यात येणार आहे. जर प्रशासनाकडून काही चूक झाली असेल तर त्या दुरुस्त करण्यात येणार आहे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. फक्त असे करीत असताना हॉकर्सने कायदा हातात घेऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. असा भावनिक संवाद अायुक्त कापडणीस यांनी सुमारे २० मिनिटे हॉकर्सशी साधला.