आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यात चाेरून मद्यविक्री; हातगाड्या उचलल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातून जाणाऱ्या महामार्गावर लागून उभ्या राहणाऱ्या खाद्यपदार्थविक्रीच्या हातगाड्यांवर बऱ्याच दिवसांपासून चाेरून मद्यविक्री सेवन सुरू असल्याच्या तक्रारी हाेत्या. त्यामुळे रामानंद पाेलिसांच्या मदतीने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बहिणाबाई उद्यानालगत शुक्रवारी कारवाई करून सहा हातगाड्या जप्त केल्या अाहेत.

अाकाशवाणी चाैक ते गुजराल पेट्राेलपंपादरम्यान महामार्गाला लागून असलेल्या खाद्यपदार्थविक्रीच्या गाड्यांवर चाेरून मद्यप्राशन केले जात असल्याची चर्चा हाेती. त्यामुळे वाद उद्भवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता हाेती. यासंदर्भात पाेलिस महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे रामानंद पाेलिसांना पत्र देऊन मदत मागण्यात अाली हाेती. पाेलिस निरीक्षक प्रवीण वाडिले यांनी प्रतिसाद देत केव्हाही फाेन केल्यास बंदाेबस्त देण्याचे अाश्वासन दिले हाेते. त्यानुसार दुपारी १२ वाजेच्या सुमारास अतिक्रमण विभागाच्या पथकाने बहिणाबाई उद्यानालगतच्या सहा हातगाड्या जप्त केल्या. याठिकाणी हातभट्टीची दारू पिशव्यांमध्ये भरून विक्री हाेत असल्याचे निदर्शनास अाले. तसेच उद्यानामागील भंगारविक्रेत्याचा वजनकाटाही जप्त करण्यात अाला. महामार्गावर रात्री उशिरापर्यंत हातगाड्यांवर मद्यविक्री सेवन हाेत असल्याच्या तक्रारी हाेत्या. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरातील इतर ठिकाणी चाेरटी दारु विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले अाहे.