आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंदे, हॉटेल्सवर नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहूर - येथील आर.टी.लेले हायस्कूलजवळ दारूची अवैध विक्री होत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी त्या मार्गाने ये-जा करणायांना त्रास सहन करावा लागत आहे. या शाळेचे अध्यक्ष जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे असूनही या प्रकाराकडे पोलिसांनी मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व्ही.जी.भालेराव यांनी पहूर कसबे ग्रामपंचायत पहूर पोलिस ठाण्यास पत्र दिले आहे. या शाळेनजीक काही अंडी विक्रेते दारू अवैध विक्री करत असल्याने दिवसभर या ठिकाणी मद्यपींची वर्दळ असते. या प्रकारामुळे शाळा भरताना सुटताना विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत आहे.

ग्रामविकासअधिका-यांचे कानावर हात
याबाबतपहूर कसबे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी म्हस्के यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शाळेच्या रस्त्यावरील उकिरड्यामुळे होणा- त्रासाबाबत पत्र मिळाले हे. पण, अतिक्रमणाबाबतचे पत्र मिळालेले नाही. मात्र, अतिक्रमण अवैध दारू विक्रीप्रकरणी आठ दिवसांपूर्वी शाळेने पत्र दिले आहे. परंतु, ग्रामविकास अधिका-यांना याची साधी कल्पनाही नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालत असेल? याबाबत शंका उपस्थित हाेत आहे.
कारवाई करण्याबाबत प्रांताधिका-यांची ‘अॅक्शन’