आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Illegal Construction At Mehroon Lake Revenue Minister Khadse

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहरूण तलावाकाठचे बांधकाम अनधिकृत,महसूलमंत्री खडसे यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावशहरातील मेहरूण तलावालगत धनदांडग्यांनी केलेले बांधकाम हे अनधिकृत आहे. तसा अहवाल महसूलमंत्री जिल्हाधिका-याना प्राप्त झाला आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी याला दुजोरा दिला. आता शासकीय दप्तरी असलेल्या नोंदीवरून अंतिम सीमांकन करून पडताळणी झाल्यानंतर कारवाईचा निर्णय होईल.
‘दिव्य मराठी’तर्फे नोव्हेंबर २०१४ रोजी धनदांडग्यांनी तोडले मेहरूणचे लचके’ या मथळ्याखाली वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन खडसे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोजणीचा प्राथमिक अहवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना प्राप्त झाला असल्याचे खुद्द खडसे यांनी पत्रकारांना सांगितले. त्यात मेहरूण तलावालगत असलेले बांधकाम अनधिकृत अतिक्रमित असल्याचे ते म्हणाले. लँड रेकॉर्डवरील नोंदी तपासून अंतिम सीमांकन केले जाईल. अतिक्रमणासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल, असेही खडसे यांनी सांगितले.